ही बाब राज्य सरकारची नाचक्कीच धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार? आता मनोज जरांगेंची मोठी मागणी

0

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.तसेच त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील निशाणा साधत मोठी मागणी केली आहे. गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली, ही बाब राज्य सरकारची नाचक्की करणारी आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?

गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली, ही बाब राज्य सरकारची नाचक्की करणारी आहे. एखादी मागणी सांगितली की ते म्हणतात चौकशी करू, त्यांना सत्तेसाठी काही गोष्टी लागल्या तर त्यांची स्पष्ट भूमिका असते, तू आमच्यासोबत येत नाही तर तुला आम्ही जेलमध्ये टाकू अशी यांची भूमिका असते. त्याला वेठीस धरून सरकारच्या बाजुनं घेतलं जातं असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे .

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

पुढे बोलताना ते म्हणाले की, या प्रकरणात कमीत कमी 200 नावं समोर येतील. गेवराईला आरोपीला रगा पुरवण्यात आल्या. चार्ज सीटमध्ये 100 टक्के छेडछाड होण्याची शक्यता आहे. तपास यंत्रणेला शंभर टक्के मुभा देण्यात आली नाही. तपास यंत्रणेला मुभा दिली असती तर अर्ध जेल भरलं असतं. धनंजय मुंडे हे देखील याच्यातच आहेत. हे सर्व त्यांचेच लोक आहेत. मग त्यांना का सहआरोपी करण्यात येत नाही, मंत्री आहेत म्हणून का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

आमचे साखळी उपोषण करणारे आरोपी होतात. जे कॅमेऱ्यामध्ये दिसले ते सहआरोपी होतात. मार आम्ही खाल्ला, डोकं आमचं फुटलं, या प्रकरणात जे पोलीस निलंबित व्हायला पाहिजे होते, त्यांना उलट बढती मिळाली असंही यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. खंडणीतून खून झाला, खून करणाऱ्या पेक्षा खंडणी मागणाऱ्या पेक्षा, सामूहिक कट करणारा मोठा असतो. असंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा