दहा दिवसांवर आषाढी एकादशी विठुरायाचे आता २४ तास दर्शन; २६ जुलैपर्यंत मंदिर राहणार खुले

0
1

पंढरपूर : पंढरपूरची आषाढी यात्रा अवघ्या काही दिवसांवर आली आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक आतापासून गर्दी करू लागले आहेत. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे आषाढी यात्रेच्या निमित्ताने आजपासून विठ्ठल रुक्मिणीचे २४ तास दर्शन सुरू करण्यात आले. पुढील साधारण २० दिवस मंदिर आता २४ तास खुले राहणार आहे.

वर्षातून एकदा येणारे आषाढी वारीची वारकरी मंडळी आतुरतेने वाट पाहत असतात. सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी वाट पाहणारे वारकरी, भाविक पंढरीत दाखल होऊ लागले आहेत. दहा दिवसांवर आषाढी एकादशी असून विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागू लागल्या आहे. त्या दृष्टीने विठ्ठल मंदिर समितीचे नियोजन देखील झाले आहे. येणाऱ्या प्रत्येक विठ्ठल भक्ताला चांगले दर्शन घेता यावे अशी व्यवस्था करण्यात आली असून मंदिर आता २४ तास सुरु ठवण्यात येणार आहे.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले

२६ जुलै पर्यंत चोवीस तास दर्शन

विठ्ठलाचा शेज घरातील पलंग काढून विठ्ठलाच्या पाठीमागे मऊ मुलायम रेशमी लोड देण्यात आला. या काळात देवाला नवरात्र बसविण्यात आले. यानंतर विठ्ठलाचे सर्व राजोपचार बंद झाले असून २४ तास दर्शनाला सुरुवात करण्यात आली. २६ जुलैपर्यंत विठ्ठल भक्तांना २४ तास दर्शनासाठी उभा राहणार आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते देवाची विधीवत पूजा करण्यात आली. २६ जुलैच्या प्रक्षाळ पुजेपर्यंत विठ्ठलाचे २४ तास दर्शन खुले राहणार आहे.