‘ओबीसी’ने घाबरू नये; ‘सगेसोयरे’चा अध्यादेश काढणार: फडणवीसांनी २०१७ सालीच कायदा केलाय: मंत्री पाटील

0

गेल्या काही महिन्यांपासून मराठा नेते मनोज जरांगे पाटील जी मागणी करत होते, ती लवकरच पूर्ण होणार आहे. राज्य सरकार लवकरच लवकरच सगेसोयऱ्याचा अध्यादेश काढणार, अशी माहिती राज्यातील मंत्री चंद्रकात पाटील यांनी दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

काय म्हणाले चंद्रकात पाटील?

माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकात पाटील म्हणाले की, ”मनोज जरांगे पाटील यांना सरकार वारंवार आवाहन करत आहे की, सगेसोयऱ्याची जी अधिसूचना काढली आहे, ज्याचा मसुदा त्यांनी तयार केला आहे, त्यावर ८ लाखांहून अधिक सूचना व हरकती आल्या आहेत. त्या टॅकल केल्यानंतर ती अधिसूचना आम्ही काढणार आहोत.”

अधिक वाचा  निवृत्तीच्या उंबरठ्यावर नसलेल्या शिक्षकांना ‘टीईटी’ बंधनकारक; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारची काय भूमिका?

ते म्हणाले की, ”याने ओबीसी समाजाने घाबरण्याचं काही कारण नाही. ओबीसी समाजालाही सरकार समजावत आहे. सगेसोयऱ्याचा अध्यादेश निघाल्यानंतर ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का बसणार नाही.”

पाटील म्हणाले की, ”या अधिसूचनेत काय आहे, तर एकाला नोंद सापडली, तर त्याच्या नातेवाईकाला ती मिळावी. २०१७ सालीच त्यावेळी मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी रक्त संबंधांमध्ये व्हेरीफिकेशनची आवश्यकता नाही, असा कायदा केला आहे.”

दरम्यान, मनोज जरांगे पाटील पुन्हा मराठा आरक्षणासाठी राज्याच्या दौऱ्यावर निघाले असून या मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीला हिंगोलीतून सुरुवात झाली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी आरोप केला आहे की, जातींमध्ये तेढ वाढवून छगन भुजबळ यांचा दंगल घडवण्याचा डाव आहे. आता जरांगे यांच्या आरोपावर छगन भुजबळ काय उत्तर देतील, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अधिक वाचा  माजी कृषीमंत्र्याच्या ‘पुत्रा’ची ‘वारसहक्क’ टिकवण्यासाठी भाजपमध्ये कोलांटउडी भाजपाचही टेन्शन गेलं; शहरभर निष्ठावंतांची नाराजी अन् बंड नवे संकट