पुणे-नाशिक महामार्ग ‘आमदार’पुतण्याने दोघांना चिरडलं; विरुद्ध दिशेने ‘सुसाट’ धडक अन् दुचाकीस्वार हवेत उडाले

0

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्यातील खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने कारखाली दोघांना चिरडल्याची घटना घडली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहेत. पुणे-नाशिक महामार्गावरील एकलहरेजवळ शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. अपघातानंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ओम भालेराव (वय १९ वर्ष) असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. तर मयुर मोहिते असं आमदार मोहिते यांच्या पुतण्याचं नाव आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या मयुर हा पुणे- नाशिक महामार्गावरून कारने पुण्याच्या दिशेने येत होता. तो विरुद्ध दिशेने सुसाट कार चालवत होता. त्यावेळी समोरून आलेल्या दोन दुचाकीस्वारांना कारने धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की दुचाकीस्वार हवेत उडाले.

डोक्याला तसेच छातील मार लागल्याने अपघातात ओम भालेराव या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. अपघातानंतर मयुर हा कारमध्येच बसून होता. त्याने कुठलीही दयामाया न दाखवता जखमींना मदत केली नाही. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत बचावकार्य केले. अपघातानंतर मृत तरुणाच्या नातेवाईकांनी मंचर पोलीस स्टेशनबाहेर मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी त्यांना शांततेचे आवाहन केले. या अपघात प्रकरणी मयुर मोहिते याच्यावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार