ब्लू प्रिंट, विधानसभा ते सरकारच्या योजनांपर्यंत…; कोअर कमिटीच्या बैठकीत काय घडलं?

0

भाजपच्या कोअर कमिटीची बैठक काल मुंबईतील सागर या निवासस्थानी झाली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून प्राथमिक ब्लू प्रिंट तयार केली जाणार आहे. तसेच पुन्हा एक कोअर कमिटीची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही एक विश्लेषणात्मक बैठक होती. ज्या ठिकाणी आम्ही कमी आहोत, त्या ठिकाणी पुन्हा एकदा संघटना वाढवणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना या समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता काय केले पाहिजे, यावर चर्चा केली. त्याचबरोबर विधान परिषदेच्या निवडणुकांवरही चर्चा झाली. सामाजिक भौगोलिक परिस्थितीच्या आधारावर आणि आणखी काही निकष लावून चर्चा केली. आम्ही यादी केंद्राकडे पाठवू आणि केंद्र त्यावर निर्णय घेईल.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

ओबीसी आरक्षणावर चर्चा नाही-

केंद्रातील बैठकी महत्त्वाची होती. त्यावरही मंथन केलं. ज्या ठिकाणी कमी आहोत त्या ठिकाणी पुन्हा काम करणार अजून चांगलं काम करणार आणि जनतेचा विश्वास पुन्हा जिंकणार, असं बावनकुळे म्हणाले. मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण या विषयावर चर्चा झालेली नाही. तो सरकारचा विषय आहे ही संघटनात्मक बैठक होती.

विधानसभेसाठी काय रणनीती असेल?

मविआने जो खोटारडेपणा केला, जनतेला फसवलं. आदिवासी जनतेला फसवलं, महिलांना फसवलं.. अशा अनेक विषयातून महाविकास आघाडीने मत घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी वचन दिल्यानुसार काम करतील. त्यामुळे जनता नक्की या खोटारडेपणातून बाहेर निघेल. केंद्रातील आणि राज्यातील सरकारी का विचाराचा असेल तर राज्यातील जनतेला फायदा होतो. केंद्रातील सरकार आताचे काम करणार आहे त्या सरकारचा पूर्णपणे उपयोग हा महाराष्ट्रातल्या जनतेला होईल. महाविकास सकाळी सरकार येणार म्हणजे केंद्रातली काम पूर्ण पणे बंद करणे. महाविकास आघाडी सरकार आल्यास जनतेचे नुकसान होईल. ते फक्त केंद्राच्या योजना थांबवण्याचे काम करते, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

उद्धव ठाकरे मंत्रालयात गेले नाहीत-

प्रचाराला अनेक मुद्दे असणार आहेत. मात्र डबल इंजिन सरकार असेल तर जनतेचा फायदा असतो. जसं उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये झालं. नरेंद्र मोदी महाराष्ट्रासाठी अनेक योजना आणायला तयार होते. मात्र उद्धव ठाकरे कधीही मंत्रालयात आले नाहीत. कधीही मोदीजींशी चर्चा केली नाही आणि त्यामुळे महाराष्ट्राचे नुकसान झालं. आम्हाला नरेंद्र मोदी नको, आम्हाला मोदीजींच्या सरकार चालत नाही या भूमिकेतून ते काम करत होते. म्हणून जनतेचे नुकसान झालं. दोन्हीकडे एका विचाराचा सरकार असेल तर जनतेचा फायदा होईल, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा