पश्चिम बंगालमध्ये रेल्वे अपघात, एक्स्प्रेसला मालगाडीची धडक

0
2

पश्चिम बंगालमध्ये सोमवारी सकाळी वाजता रेल्वेचा अपघात झाला आहे. कंचनजंगा एक्स्प्रेसला एका मालगाडीने मागून धडक दिली. या अपघातात नऊ आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २५ प्रवासी जखमी झाले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या भीषण अपघातावर शोक व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, कंचनजंगा एक्स्प्रेसला मालवाहतूक करणाऱ्या ट्रेनने धडक दिल्यामुळे अपघात झाला. आता घटनास्थळी बचाव आणि मदत कार्य सुरु केले आहे.

हेल्पलाईन नंबर जारी

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, डॉक्टर, रुग्णवाहिका आणि आपत्ती व्यवस्थापन पथक अपघाताच्या ठिकाणी पोहचले आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी प्रवाशांचा आरडाओरडा सुरु झाला. अपघातानंतर NDRF, SDRF टीम आणि 15 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. प्रशनाकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

मागील तीन डब्यांचे नुकसान

आगरतळा ते सियालदहला जाणारी ट्रेन क्रमांक 13174 कंचनजंगा एक्स्प्रेसला मागून मालगाडीने धडक दिल्यामुळे अपघात झाला. एनजेपी ते सियालदह या मार्गावर सिलीगुडीहून पुढे गेल्यानंतर रंगपानी स्टेशनजवळ हा अपघात झाला. या अपघातामुळे मागील तीन डब्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. रंगपाणी आणि निजबारी स्थानकांदरम्यान ही घटना घडली आहे.

अपघातासंदर्भात कटिहार डीआरएमने सांगितले की, अपघाताच्या कारणांची तपासणी केली जात आहे. कटिहार आणि न्यू जलपाईगुडी (NJP) येथून बचाव पथके अपघातस्थळी रवाना करण्यात आली आहेत. जखमींच्या मदतीसाठी वैद्यकीय पथकेही रवाना आहेत. अपघातस्थळी पाऊस सुरु असल्यामुळे मदत आणि बचाव कार्यासाठी अडथळे येत आहेत.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार

रेल्वेमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, घटनास्थळी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम पोहचली आहे. त्यांनी मदत आणि बचावकार्य सुरु केले आहे. रेल्वे आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.

अश्विनी वैष्णव तातडीने पश्चिम बंगालला रवाना

कांचनजंगा एक्स्प्रेस अपघातानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तातडीने पश्चिम बंगालला रवाना झाले आहे. ते दार्जिलिंगमधील अपघातस्थळाला भेट देणार आहे. अपघात स्थळाची ते पाहणी करणार आहे. तसेच जखमींची रुग्णालयात जाऊन भेट घेणार आहे.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?