मंत्रिमंडळ विस्तार मोठे फेरबदल पुण्यातही मंत्रिपद काहीचं प्रमोशन खातं बदलही, मराठा नेतृत्वही वाढणार: सूत्र

0

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे नेते राज्याच्या राजकारणात मोठं पाऊल उचलणार आहेत. राज्य सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर आता विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर आता महायुतीचं रखडलेलं मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या मंत्रिमंडळात कुणाकुणाला संधी मिळणार? याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरुन महाराष्ट्राचं राजकारण अनेकदा तापताना बघायला मिळालं. अनेक नेत्यांकडून उघडपणे मंत्रिपदाची इच्छा याआधी व्यक्त करण्यात आली. पण शिंदे सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झाला नाही. आता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्य सरकारचा मंत्रिमंड विस्तार होणार असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजायला आता केवळ 4 महिन्यांचा अवकाश आहे. असं असताना राज्य सरकारकडून नाराज नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  शिक्षक मतदारसंघातील मतदानादरम्यान उमेदवार ढसाढसा रडला, सर्व व्यवस्थेवरचा विश्वास उडालाय, मी इस्लाम स्वीकारणार

विशेष म्हणजे मराठा समाजाला खूश करण्यासाठी मराठा चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाण्याची शक्यता आहे.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी महायुती सरकारचं मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात काही मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल केला जाईल. तर काही मंत्र्यांना प्रमोशन मिळणार असल्याचीदेखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मंत्रिमंडळ विस्तारात मराठा फॅक्टरदेखील दिसण्याचा अंदाज आहे.

मंत्रिमंडळात हे फेरबदल होण्याची शक्यता

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विजयकुमार गावित आणि सुधीर मुनगंटीवार यांची खाती बदलली जाण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  केंद्र सरकारचा मोठा निर्णय निर्बंध हटवले, चांदी स्वस्त होणार… सहा महिन्यांसाठी 6500 मेट्रिक टन चांदी आयातीला मंजुरी

भाजप नेते रविंद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांचं प्रमोशन होण्याची शक्यता आहे.

आमदार गणेश नाईक आणि आमदार नितेश राणे यांनाही मंत्रिमंडळात स्थान

महिला आमदार माधुरी मिसाळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते.

आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांना संधी मिळण्याची देखील दाट शक्यता आहे.