भाजपचे नवे शक्तिकेंद्र ‘कोथरूड’?! मंत्रीमहोदय मोहोळ, खासदार कुलकर्णी अन् चंद्रकांतदादाची ताकद येथेच एकवटली

0

पुण्यात भारतीय जनता पक्षाला मानणारा वर्ग अलीकडच्या काळातच आहे असे नव्हे तर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या काळातही होता. त्या आधी फारसे नसले तर काही प्रमाणात भाजपचे लीडर होते. या मतदारसंघात मोदी-शहा यांच्या आदींच्या काळातही भाजपचा मतदार मोठ्या प्रमाणात होता. त्याकाळी गोपीनाथ मुंडे यांना मानणारी मंडळीही होती. यावेळी शहरात हाताच्या बोटावर मोजण्याइतपत महापालिकेत भाजपचे नगरसेवक होते. आता त्यामध्ये वाढ होऊन नगरसेवकांचा आकड़ा 100 पर्यंत पोचला आहे.

पुण्यात अण्णा जोशी, प्रदीप रावत व गिरीश बापट यांनी लोकसभा निवडणूक जिंकून दाखवली. बापट हे 5वेळा आमदार 2वेळ खासदार राहिल्याने भाजपमध्ये शक्तिकेंद्र ते ठरले. परिणामी बापट हे कसब्याचे नेतृत्व करीत असल्याने सारी सूत्र कसब्यातून हालत होती, त्यामुळे बापट यांच्यामुळे कसब्यात भाजपचे शक्तिकेंद्र झालं होते. त्यानंतर खऱ्या अर्थाने २०१४ पासून भाजपची घोडदौड सुरु झाली. त्याच वर्षी शहरात सर्व आठही ठिकाणी भाजपचे आमदार झाले. त्यानंतर 2017 साली झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीतही भाजपचा दबदबा वाढला. या निवडणुकीत 98 नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

पालिकेत सत्ता आली आणि अत्यंत महत्वाची पदे कोथरूडकर सरकली. या निवडणुकीनंतर महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ झाले, त्यानंतर लगेचच मोहोळ महापौर झाले. मोहोळ पुण्याचे खासदार झाले अन त्यांनतर केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्यामुळे गेल्या काही दिवसात कोथरूडमध्ये भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

पुणे महापालिकेत सुद्धा याच भागातून 12 ते 13 नगरसेवक होते. त्यासोबतच कोथरूडचे प्रतिनिधित्व करणारे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे राज्य सरकारमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्रिपद देण्यात आले, पुणे शहर भाजपचे मध्यवर्ती कार्यालय सुद्धा कोथरूड मध्येच आहे. गेल्या अडीच तीन महिन्यातच मेधा कुलकर्णी या राज्यसभेवर गेल्या. त्यामुळे आता भाजपमध्ये नवीन शक्तिकेंद्र म्हणून कोथरुडकडे पहिले जात आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती