पुणे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाला आहे. महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात उतरलेल्या रवींद्र धंगेकर यांना त्यांच्याच मतदारसंघांमध्ये पिछाडी वरती राहायला लागला आहे. कसब्यामधून भाजपाला तब्बल 15 हजाराचा मताधिक्य मिळाल्याने याचे श्रेय घेण्यासाठी भाजपमधून चढाओढ सुरू आहे. यावरून दिवंगत माजी खासदार गिरीश बापट यांचे पुत्र गौरव बापट संतापले आहेत.






या निवडणुकीत अनेक घटकांनी सहभाग घेतला. पंतप्रधान मोदी Narendra Modi यांच्यावर मतदारांनी दाखवलेला विश्वास हा लोकसभा विजयातील सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते, पतीत पावन संघटनेचे कार्यकर्ते, शिवसैनिक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसैनिक, राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते, रिपाई आठवले गटाचे सर्व कार्यकर्ते, लोकजनशली पक्षाचे कार्यकर्ते, अनेक सामाजिक संघटना या सर्वांचा वाटा या विजयात आहे, याकडेही बापटांनी लक्ष वेधले.
मुरलीधर मोहोळ Murlidhar Mohol यांच्यावर जनतेने विश्वास दाखवला. ही व्यक्ती आपले प्रतिनिधित्त्व संसदेमध्ये करण्यास सक्षम आहे हा तो विश्वास होता. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. शहर अध्यक्षांचा सहभाग होता, नेता पराभवाची जबाबदारी घेतो, तर विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांला देतो. पुणे शहरातील लोकसभेचा विजय हा भारतीय जनता पक्षाचा विजय आहे. मोदींच्या सक्षम नेतृत्वाचा विजय आहे. मुरलीधर मोहोळांच्या लोकप्रियतेचा विजय असे ठासून सांगत बापट यांनी अमुक मतदारसंघात माझ्यामुळे मताधिक्य मिळाले हे सांगणे, त्याची सर्वत्र जाहिरात करणे, बॅनर लावणे हे हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे.
दिवंगत वसंतराव भागवतांचे, रामभाऊ म्हाळगी यांचे (ज्यांच्या नावाच्या प्रबोधिनीत आम्ही कार्यकर्ते शिक्षण घेतो) गिरीश बापटांचे हे संस्कार नाहीत. कार्यकर्ता हा पक्षाचा पाया आहे. मूळ आहे. स्वताच्या नावाची टिमकी वाजवून आपण त्या कार्यकर्त्याला अपमानीत करतो आहोत. यातून आपणच आपल्या पायावर कुन्हाड मारतो आहोत. अधिक स्पष्टवक्तेपणा हा राजकारणात घातक असतो, असे दिवंगत गिरीश बापट मला सांगायचे. पण कधी कधी इलाज नसतो, असे म्हणत पोस्टरबाजी करणाऱ्यांचे कानही बापट यांनी टोचले आहेत.










