आपल्या देशाचे नेते मा. नरेंद्रभाई मोदीजी हे तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत, शपथविधी सोहळ्याचा जल्लोष आनंद साजरा करण्यासाठी पुण्यातील रस्त्या रस्त्यांवरती जल्लोष सुरू आहे परंतु यावेळी शपथविधी सोहळ्यासाठी एक वेगळाच उत्साह आहे. पुण्यातून प्रथमच खासदार झालेले माजी महापौर आणि महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस मुरलीधर अण्णा मोहोळ यांनाही मंत्रिपदाची संधी मिळाल्यामुळे उत्साह दुहेरी झाला आहे.






पुणे शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा ठिकाणी लाईव्ह करण्यासाठी व उत्साह साजरा करण्यासाठी नियोजन केले आहे परंतु आज सकाळी पुणेकरांची दिवसाची सुरुवात झाली त्यावेळेस पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनाही मंत्रिपद मिळणारी याची खात्री झाल्यानंतर पुण्यामध्ये एक वेगळाच आनंद उत्सव साजरा केला जात आहे. पुण्यातील निवडणुकीदरम्यान अनेक विरोधकांच्या टीकेला संयमी भूमिका घेत भारतीय जनता पक्षाने आपल्या प्रचारावरती लक्ष केंद्रित ठेवून उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्न केले. विरोधकांची काय म्हणतात पुणेकर….. ही घोषणा लोकप्रिय झाली होती. संपूर्ण निवडणुकीदरम्यान विरोधकांच्या कोणत्याही टीकेला उत्तर न देता किंवा त्यांनी केलेल्या हेतू परस्पर कृत्याला प्रतिसाद न देता भारतीय जनता पक्षाने सर्वसामान्य पुणेकरांपर्यंत आपले विचार पोहोचवण्याला प्राधान्य दिले आणि निवडणुकीमध्ये यश संपादन केले.
आज आनंदउत्सव साजरा करताना मात्र पुणे शहरातील सर्वच कार्यकर्त्यांनी आपला संदेश विरोधकांना देण्याचे काम केले आहे. हीच वेळ जुना हिशोब पूर्ण करण्याची अशी समज लक्षात घेऊन आनंद उत्सव करताना महाराष्ट्र केसरीची गदा आणि काय म्हणतात पुणेकर खासदार झाले मुरलीधर! हा संदेश देत पुणे मध्ये नवा अध्याय सुरू झाल्याच्या संकेत दिला आहे.











