महाराष्ट्र वडार समाजाचे प्रेरक ‘आधारवड’ कालवश; सिव्हिल सर्जन डॉ. लक्ष्मणराव देगलूरकर सर हरपले

0
2

अहमदनगरमधील वडार समाजाच्या 1994च्या ऐतिहासिक मेळाव्याचे आयोजक आणि संपूर्ण समाजामध्ये ‘ऐक्य’ निर्माण करून वडार समाजाच्या अस्तित्वाची संपूर्ण महाराष्ट्राला जाणीव करून देणारे अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटनेचे संस्थापक नगरचे सिव्हिल सर्जन डॉ. लक्ष्मणराव देगलूरकर यांची 25 मे 2024 रोजी प्राणज्योत मावळली. ‘जय बजरंग… जय वडार….’ या  वडार समाजामध्ये प्रसिद्ध असलेल्या नाऱ्याचे निर्माते म्हणून डॉ. लक्ष्मणराव देगलूरकर यांचे बहुमुल्य योगदान राहिले आहे. महाराष्ट्रामध्ये पूर्वी वडार ना समाज संघटित होता ना समाजाला दिशा होती अतिशय विखुरलेल्या अवस्थेत समाज जीवन जगत असताना अहमदनगर आणि इतर त्यांच्या सहकाऱ्यांना एकत्र करून वडार समाजामध्ये जनजागृतीच्या कार्याला डॉ. देगलूरकर यांनी सुरुवात केली होती.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

स्वतः उच्चशिक्षित झाल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम वाड्या वस्त्यावरील वडार समाजाला जागृतीच्या वाटेची जाणीव करून देण्याचे काम डॉ. लक्ष्मणराव देगलूरकर तत्कालीन कालखंडामध्ये केले. समाज प्रबोधन आणि जागृतीच्या कार्यामध्ये मी तन-मन धनाने सहभागी होतं. 1994 साली वडार समाजामध्ये चळवळ निर्माण झाली. वडार समाज समाजव्यवस्थेमध्ये शिक्षण, रोजगार, आरोग्याबाबत अनास्था अन् अंधश्रद्धा व्यसनाधीनता असताना 1994 साली महाराष्ट्रातील गाव खेड्यातील वाड्या वस्तीवर राहणाऱ्या वडार समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचे अतिशय कठीण कार्य डॉ. देगलूरकर यांनी प्रशासकीय नोकरी सांभाळून वडार समाजातल्या सहकाऱ्यांच्या सहयोगाने महाराष्ट्रामध्ये एक नवी क्रांती वडार समाजामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

डॉ. देगलूरकर यांनी महाराष्ट्रातील वडार समाजामध्ये ‘जय बजरंग जय वडार….’ या नाऱ्याचे जे क्रांतीच बीज पेरलं, ते बीज आजच्या युवा पिढीचा निर्धार बनला आहे. तमाम महाराष्ट्रातील वडार समाज बांधवांसाठी डॉ. लक्ष्मणराव देगलूरकर यांच्या जाण्याने मोठं नुकसान झाले आहे. तमाम महाराष्ट्र डॉ. देगलूरकर यांना कधीही विसरू शकत नाही. वडार समाजामध्ये आज अनेक संघटक आणि संघटन असले तरीसुद्धा या सर्वांना कायम प्रेरक आणि समाज हिताचा सल्ला देण्याचे काम डॉ. देगलूरकर यांनी केले. गटातटाचे भेदभावाचे राजकारण बाजुला ठेवून समाज बांधवांनी एकत्र येऊन डॉ. देगलूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार