धोनीच्या चाहत्यांसाठी मोठी अपडेट, अंतिम निर्णयाआधी चेन्नईकडे केली ‘ही’ महत्त्वाची मागणी

0

गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचं लेऑफच्या शर्यतीतील आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पराभव झाल्यानंतर संपुष्टात आलं. आरसीबीनं चेन्नईला 27 धावांनी पराभूत केलं. चेन्नईला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आरसीबीविरुद्ध 201 धावा करण्याची गरज होती. अखेरच्या ओव्हरमध्ये चेन्नईला 17 धावांची आवश्यकता असताना ते केवळ 7 धावा करु शकले. महेंद्रसिंह धोनीनं पहिल्या बॉलवर षटकार मारला. दुसऱ्या बॉलवर यश दयाळला षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. पुढील चार बॉलमध्ये चेन्नईला केवळ एक रन करता आली आणि त्यांचं प्लेऑफमधील आव्हान संपलं. यानंतर महेंद्रसिंह धोनी दुसऱ्याच दिवशी सकाळी रांचीला निघून गेला. यानंतर महेंद्रसिंह धोनी पुढील आयपीएलमध्ये खेळताना दिसणार की नाही याबाबत चर्चा सुरु झाल्या. धोनी पुढील आयपीएलमध्ये खेळणार की नाही यासंदर्भात टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रात वृत्त प्रकाशित झालं आहे. धोनीनं अंतिम निर्णयासाठी वेळ मागून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

चेन्नईच्या आरसीबी विरुद्धच्या पराभवानंतर धोनी दुसऱ्याच दिवशी रांचीला गेला. चेन्नई सुपर किंग्जच्या इतर खेळाडूंना धोनीची बंगळुरुतील मॅच शेवटची नसेल असा विश्वास आहे. धोनीनं चेन्नई सुपर किंग्जमधील कुणालाही तो आयपीएल सोडणार असल्याबाबत सांगितलेलं नाही. धोनीनं अंतिम निर्णयासाठी काही महिन्यांची वाट पाहावी, असं संघ व्यवस्थापनाला कळवल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

महेंद्रसिंह धोनीनं आयपीएलमधील अखेरची मॅच चेन्नईमधील चेपॉक स्टेडियमवर खेळण्याचं प्रॉमिस केलं होतं. तो ते पूर्ण करेल असा विश्वास चेन्नई सुपर किंग्जला आहे. धोनीनं बंगळुरु विरुद्धच्या मॅचमध्ये 200 च्या स्ट्राइक रेटनं 25 धावा केल्या होत्या. धोनीचं स्ट्राइक रेट रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे यांच्यापेक्षा जास्त होतं.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

चेन्नईच्या आरसीबी विरुद्धच्या पराभवानंतर धोनी दुसऱ्याच दिवशी रांचीला गेला. चेन्नई सुपर किंग्जच्या इतर खेळाडूंना धोनीची बंगळुरुतील मॅच शेवटची नसेल असा विश्वास आहे. धोनीनं चेन्नई सुपर किंग्जमधील कुणालाही तो आयपीएल सोडणार असल्याबाबत सांगितलेलं नाही. धोनीनं अंतिम निर्णयासाठी काही महिन्यांची वाट पाहावी, असं संघ व्यवस्थापनाला कळवल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

महेंद्रसिंह धोनीनं आयपीएलमधील अखेरची मॅच चेन्नईमधील चेपॉक स्टेडियमवर खेळण्याचं प्रॉमिस केलं होतं. तो ते पूर्ण करेल असा विश्वास चेन्नई सुपर किंग्जला आहे. धोनीनं बंगळुरु विरुद्धच्या मॅचमध्ये 200 च्या स्ट्राइक रेटनं 25 धावा केल्या होत्या. धोनीचं स्ट्राइक रेट रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे यांच्यापेक्षा जास्त होतं.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार