घाटकोपर होर्डींग अन् पेट्रोल पंप सर्वच अनधिकृत! अशी ‘लिम्का बुक’मध्ये नोंद: मात्र व्यवस्थेने असे झटकले हात…

0
1

बेकायदेशीर उभं केलेलं होर्डिंग वादळी पावसानं पडलं आणि १४ जणांचा बळी मुंबईकरांचे जीव किती स्वस्त, त्याचं उदाहरण देशानं पुन्हा पाहिलं. अजुनही अनेक लोक उपचार घेतायत. दरम्यान जिथं दुर्घटना घडली., त्याच भागात मोदींच्या रोड शोवरुन राजकारणही पेटलंय. दोन्ही बाजूनं आरोप-प्रत्यारोप सुरु झालेयत. दुर्घटनेमधून व्यवस्थेने असे झटकले हात….

हा परिसर रेल्वेच्या अखत्यारित येतो. या बाजूला रेल्वे पोलिसांची वसाहत आहे. मात्र रेल्वे पोलिस दोन प्रकारात मोडतात. एक आरपीएफ…म्हणजे रेल्वे पोलीस फोर्स आणि दुसरे जीआरपी म्हणजे ग्राऊड पोलीस फोर्स. आरपीएफ हे पूर्ण केंद्राच्या म्हणजे रेल्वेच्या अखत्यारित तर जीआरपी हे महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारित आहे. आता महापालिकेनं म्हटलंय की संबंधित जमीन ही रेल्वेच्या अखत्यारित येत होती. रेल्वे पोलिसांनी म्हटलंय की होर्डिंगला परवानगी २०२१ साली तत्कालीन जीआरपीचे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्या आदेशानं 10 वर्षांसाठी देण्यात आली होती. जीआरपी हे महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारित आहे. एका दावा असाही आहे की संबंधित जमिनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित होती. जी रेल्वेला देण्यात आली.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

दुर्घटनेनंतर टोलवाटोलवी सुरु झालीय मात्र ज्यावेळी मुंबईतलं सर्वाधिक मोठं होर्डिंग म्हणून लिम्का बुक रेकॉर्डमध्ये गाजावाजा झाला. तेव्हा हे होर्डिंग अनधिकृत आहे म्हणून कुणीच कारवाई का केली नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे. दुर्घटनेनंतर महापालिकेनं आजूबाजूची ३ होर्डिंग हटवली आहेत. होर्डिंग अनधिकृत होतं. होर्डिंग मालकावर असंख्य गुन्हे होते. त्याची आधीची कंपनी ब्लॅकलिस्टेट होती. आरोपांनुसार जो पेट्रोलंप होता, तो सुद्दा अनधिकृतपणे उभा होता., थोडक्यात काय तर सर्वच अनधिकृत होतं., मात्र तरी १४ जीव जाईपर्यंत सगळेच शांत होते.

मुंबईत कायद्यानुसार ४० फूट उंच होर्डिंगची परवानगी आहे. पण हे होर्डिंग १२० फुटांचं 12 मजली इमारतीच्या उंचीएवढं होतं. प्रत्यक्षात परवानगी ४ मजली इमारतीच्या उंचीइतक्या होर्डिंगची होती. गुगल अर्थवरुन या भागाची पाहणी केल्यास संबंधित होर्डिंगला अडसर ठरणारी असंख्य झाडं मेली आहेत किंवा मारली गेली आहेत., हे स्पष्टपणे दिसतंय. त्याबद्दल मुंबई महापालिकेनं संबंधित मालकाविरोधात तक्रारही केल्याची माहिती आहे.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

मालक भावेश बिंडे कोण आहे?
भावेशचे वडिल रिक्षा चालवायचे. सुरुवातीला जाहिरात कंपनीत त्यानं शिपाई म्हणून काम केलं. नंतर स्वतःची कंपनी उघडली., कंपनीला नाव दिलं गुज्जू अॅड्स कंपनी. मात्र नियम मोडल्यानं महापालिकेनं गुज्जू कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं. भावेशनं पुन्हा इगो मीडिया नावाची जाहिरात कंपनी उघडली. त्याच जाहिरात कंपनीच्या मालकीचं घाटकोपरमधलं होर्डिंग होतं. भावेशचं शिक्षण फक्त १० वी आहे. सुरुवात ठाण्यातून झाली नंतर मुलूंड, भांडूप, कुर्ला, कांजूरमार्ग, घाटकोप, विद्याविहार, माटुंगा, परळ इथंही त्यानं होर्डिंग्सची कंत्राटं मिळवली.

2009 ला मुलुंड विधानसभेत तो अपक्ष म्हणून उभा होता. त्यावेळी त्याची संपत्ती २ कोटींच्या घरात होती. त्याच्यावर 21 गुन्हे दाखल होते. सर्वच्या सर्व गुन्हे बेकायदेशीर होर्डिंग्ससंदर्भातील याशिवाय बलात्कार, विनयभंगाच्या गुन्ह्यात तो जामिनावर बाहेर होता. होर्डिंग पडल्यानंतर भावेशच्या अटकेसाठी पोलीस त्याच्या घरी धडकले मात्र त्याआधीच घराला टाळं ठोकून भावेश फरार झाला. दुर्घटनेनंतर त्याला अटक होईल म्हणून फरार होण्याचा सल्ला त्याला पोलिसांमधूनच मिळाल्याची माहिती हिंदुस्थान टाईम्सनं सूत्रांच्या हवाल्यानं छापली आहे.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले