सरकारच्या विरोधात रॅप सॉंग केल्याने दुसरा गुन्हा दाखल; राजकारण तापलं

0

मुंबई पोलिसांनी रॅप सॉंग कलाकार उमेश खाडे याच्या विरोधात सरकारवर टीका करणारे रॅप सॉंग सादर केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे, महाराष्ट्र पोलिसांनी सरकारला लक्ष्य करणारी गाणी सादर केल्याच्या आरोपाखाली एका आठवड्यात दोन वेगवेगळ्या रॅपर्सवर गुन्हे दाखल केले आहेत. शुक्रवारी मुंबईतील वडाळा भागात राहणारा रॅपर उमेश खाडे याच्यावर त्याच्या “भोंगळी केली जनता” या गाण्यासाठी एफआयआर दाखल करण्यात आला. खाडे यांनी हे गाणे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शंभो नावाच्या अकाऊंटवर अपलोड केले होते आणि ते गाणे चांगलेच व्हायरल झाले होते. त्याच्या विरोधात विविध कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्याला गुरुवारी पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आणि नंतर त्याला जाण्याची परवानगी देण्यात आली. खाडे यांना जेव्हा आवश्‍यक असेल तेव्हा तपास अधिकाऱ्यासमोर हजर राहण्यास सांगणारी नोटीस बजावण्यात आली, तथापि रॅपरला अटक करण्यात आली नाही असेही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  गोकुळचा पराभव जिव्हारी? महायुतीने पुन्हा एकदा दंड थोपटले? अध्यक्षपद रणनीती विधान परिषद निकालानंतरच ठरणार

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हे गाणे ट्‌विट करून खाडे यांच्या गाण्यात आक्षेपार्ह काहीही नसल्याचे म्हटले होते. तत्पूर्वी, शेजारच्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ पोलिसांनी बुधवारी रॅपर राज मुंगसे विरुद्ध त्याच्या गाण्याबद्दल पहिला गुन्हा दाखल केला ज्याने महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप सरकारला कोणाचेही नाव न घेता अपमानास्पद भाषा वापरून लक्ष्य केले होते, असा आरोप आहे.