पुण्यात धंगेकरांसाठी रणानिती बदलली; १२ आमदारांचा तळ अन् आत्ता या 4जमेच्या बाजूसाठी ‘कानडी’ही सक्रिय

0

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी राज्यातील 12 आमदारांसह परराज्यातील लोकप्रतिनिधींनी पुण्यात ठाण मांडले आहे. यामध्ये विदर्भातील 6 आमदारांचा समावेश आहे. काँग्रेसने पुण्याची जागा प्रतिष्ठेची केली असून, त्यासाठी कर्नाटकातूनही पुण्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत असल्याची काँग्रेसच्या गोटात चर्चा आहे. पुणे शहरात काँग्रेस प्रचार यंत्रणेमध्ये कोणत्याही प्रमाणात पाठीमागे न राहावा या उद्देशाने सुरुवातीला १२(विदर्भातील सहा आमदार आणि अन्य सहा आमदारांनी) पुण्यामध्ये तळ ठोकलेला असताना रवींद्र धंगेकर यांच्यासाठी एक आनंदाची गोष्ट घडली ती म्हणजे सोशल माध्यमांवरती विरोधकांवर सक्रिय हल्ला करण्यासाठी कर्नाटकातून विशेष मदत मिळण्यास सुरुवात झाली आहे. याबरोबर बरंच यशस्वी मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी आवश्यक असणारे सर्व तंत्रज्ञान आणि तत्सम साहित्याचे ही कर्नाटकातून नियंत्रण केले जाणार असून ऐन मोक्याच्या वेळी रवींद्र धंगेकर यांना हा मोठा दिलासा मिळणार आहे.

अधिक वाचा  हैदराबाद गॅझेट जीआरला तात्काळ ‘स्थगिती’स सुप्रीमचा नकार; आता मुंबई उच्च न्यायालयात नियमित सुनावणी होणार

‘देशात सध्या मोदी सरकार व भाजपविरोधात जनमत तयार झाले आहे. या वातावरणाचा फायदा घेण्याची हीच योग्य संधी आहे. थोडी अधिक मेहनत घेतल्यास पुण्यात विजय नक्की मिळू शकतो,’ असे काँग्रेसच्या अहवालातून समोर आले आहे. राहुल गांधींच्या सभेमुळे पक्षासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. निरीक्षकांशिवाय सांगलीची निवडणूक झाल्यानंतर माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम हेदेखील पुणे लोकसभा समन्वयक म्हणून प्रचारात सक्रिय झाले आहेत.

विदर्भातील मतदान झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भातील सहा आमदारांची पुण्यात निरीक्षक म्हणून नियुक्ती केली असून, प्रत्येकाला एक विधानसभा मतदारसंघ वाटून दिला आहे. या निरीक्षकांनी दररोज या मतदारसंघात फिरून महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची मोट बांधून प्रचारावर भर द्यायचा आहे.

अधिक वाचा  जनशक्ती पुढे महाशक्ती पराभूत! जैन बोर्डिंग व्यवहार रद्द होणार, नैतिकता अखेर जागृत व्यवहारातून बाहेर पडण्याचा विशाल गोखलेंचा निर्णय

हे जमेचे घटक

– राज्यघटना बदलण्याच्या वक्तव्यांमुळे दलित मतदार आणि मोदींच्या भाषणातील तीव्र मुस्लीमविरोधामुळे मुस्लिम मतदारांमध्ये तीव्र नाराजी आहे.

– वंचित बहुजन आघाडी आणि ‘एमआयएम’ हे पक्ष भाजपसाठीच फायद्याचे ठरत असल्याचे काँग्रेसच्या लक्षात आले आहे. राज्यघटना वाचवायची असेल, तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही, हे जनतेला कळून चुकले आहे.

– अजित पवार यांना सोबत घेतल्याने भाजपच्या पारंपरिक मतदारांमध्ये नाराजी आहे. याशिवाय महाविकास आघाडीतील पक्ष आणि संघटनांनी पक्षाच्या संघटनेला बळ मिळाले आहे.

– पुण्यातील उमेदवाराची प्रतिमा, लोकप्रियता यामुळे काँग्रेसचा अहवाल अतिशय सकारात्मक आहे. त्यामुळे राज्याचे प्रभारी रमेश चेन्नितला यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे.

अधिक वाचा  एरंडवण्यात दिवाळीनिमित्त आपुलकीचे नाते दृढ करणारा भाऊबीजेचा सण; चंद्रकांतदादांच महिला भगिनींतर्फे औक्षण