अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान आयोजित १३४ व्या भीमजयंती महोत्सवानिमित्त विनामूल्य लकी ड्रॉ सोडत कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

0

मुंबई दि. २४ (रामदास धो. गमरे) शैक्षणिक, सामाजिक, लघुउद्योग क्षेत्रात अग्रगण्य कार्य करून समाजातील सर्वच स्तरातील लोकांच्या उत्कर्षासाठी अविरत झटणाऱ्या अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान (रजि.) च्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३४ व्या जयंती पर्वाचे औचित्य साधून १३४ विनामूल्य लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते सदर लकी ड्रॉ चा सोडत कार्यक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल वंजारे यांच्या अध्यक्षतेखाली आरंभ बँक्वेट हॉल, भोईवाडा, परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्तविक मुंबई अध्यक्ष संदीप मोहिते यांनी केले तर पाहुण्यांचे स्वागत संस्थापक अध्यक्ष अमोल वंजारे यांनी केले तद्नंतर पाहुण्यांच्या शुभहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरवात झाली. सदर कार्यक्रमास प्रवासी ॲप चे श्री.विजय रेड्डी, माजी नगरसेवक व सोलापूर विभागाचे संपर्कप्रमुख अनिल कोकिळ, युवासेना महाराष्ट्र संघटक पवन जाधव, बौद्धजन पंचायत समितीचे सरचिटणीस राजेश घाडगे, अक्षरा सामाजिक प्रतिष्ठानचे विश्वस्त सुजीत माटे, शिवडी विभाग १३ चे गटप्रमुख राजभाऊ तथा रामदास धो. गमरे आदी मान्यवरांनी उपस्थिती लावून बाबासाहेबांच्या जीवनपटाचा आढावा घेत आपले मौलिक असे विचार व्यक्त केले तसेच जयंतीप्रीत्यर्थ सामाजिक उपक्रम राबवित लकी ड्रॉ चे आयोजन केल्याबद्दल कोडकौतुक ही केले.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितांना संबोधित करत असताना माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी “महिलांना चूल आणि मूल यापलीकडे जाता येत नव्हत परंतु बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून महिलांना पुरुषांच्या जोडीला स्वतंत्र अधिकार व हिंदूकोड बिलच्या माध्यमातून वारसाहक्काचा अधिकार देऊन खऱ्या अर्थाने महिलांना गुलामीच्या जोखडातून सोडवायचे काम बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून केल्याने महिला आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अंतराळात ही पोहचत आहेत, म्हणून देशातील सर्वच जाती-धर्म-पंथाच्या महिलांवर बाबासाहेबांचे ऋण आहेत, या ऋणातून उतराई व्हायचे असेल तर सर्व जाती-धर्म-पंथाच्या महिलांनी- बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करायला हवेत” असे प्रतिपादन केले.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त १३४ स्पर्धकांना अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान (रजि.) च्या वतीने भरघोस बक्षिसे देण्यात आली, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही १४ एप्रिल ला असल्याकारणाने १४ विशेष बक्षिसे व १३४ वी जयंती असल्याकारणाने आकर्षक अशी एकूण १३४ बक्षिसे ठेवण्यात आली होती, सदर लकी ड्रॉ मध्ये प्रथम बक्षीस श्वेता बाळकृष्ण पवार यांना २ व्यक्तींसाठी वर्षातून ३ वेळा L D रिसोर्टची सहल, द्वितीय बक्षीस लोकमन देवाडिगा यांना २ व्यक्तींसाठी वर्षातून २ वेळा L D रिसोर्टची सहल, तृतीय बक्षीस मालती दवे यांना २ व्यक्तींसाठी वर्षातून १ वेळा L D रिसोर्टची सहल व इतर १३१ आकर्षक बक्षिसे देण्यात आले, तसेच सहभागी स्पर्धकांना ५ लाखाचा मोफत अपघात विमा प्रवासी ॲप विजय रेड्डी यांच्या वतीने अक्षरा सामाजिक प्रतिष्ठानच्या सहकार्याने देण्यात आला, सामाजिक कार्यात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल संजीव जाधव व सावंत मॅडम यांना सन्मानपत्र, पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मानित करण्यात आले.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानून अध्यक्ष अमोल वंजारे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.