अखेर मुंबई इंडियन्समधील भांडण आलं समोर, मॅनेजमेंटसमोर कोणी केली हार्दिकची तक्रार?

0

चार वर्षात दुसऱ्यांदा मुंबई इंडियन्स आयपीएलच्या सीजनमधून बाहेर होणारी पहिली टीम बनली आहे. 2022 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम पॉइंट्स टेबलमध्ये तळाला 10 व्या नंबरवर होती. आता नवीन कॅप्टन हार्दिक पांड्याच्या कार्यकाळातही हीच स्थिती आहे. मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये सर्वकाही आलबेल नाही, ही आधीपासूनच चर्चा होती. आता प्रथमच मतभेद समोर आले आहेत. एका वर्तमानपत्राच्या बातमीतून हा दावा करण्यात आला आहे. मुंबई इंडियन्समधील सिनिअर खेळाडूंनी हार्दिकच्या नेतृत्वाखाली टीम चालवण्याच्या कार्य पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलय. मॅनेजमेंटकडे याची तक्रार केली आहे. रोहित शर्माला कॅप्टनशिपवरुन तडकाफडकी हटवून त्याजागी हार्दिक पांड्याची नियुक्ती करण्यात आली. हा निर्णय अनेक माजी क्रिकेटपटूंसह मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना पटला नव्हता.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचे पाचवेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली. आयपीएलच्या इतिहासातील मुंबई इंडियन्स एक यशस्वी संघ आहे. त्या टीमवर तीन वर्षात दुसऱ्यांदा साखळी फेरीतच बाद होण्याची नामुष्की ओढवली आहे. हार्दिक पांड्यावर मुंबई इंडियन्सचे फॅन्स इतके नाराज होते की, मुंबईच्या प्रत्येक मॅचच्यावेळी स्टेडियममध्ये त्याच्याविरोधात हूटिंग, घोषणाबाजी करण्यात आली. फक्त वानखेडे स्टेडियमवरच नाही, मुंबई इंडियन्सची टीम जिथे, जिथे खेळली, तिथे हे दृश्य होतं.

टीम मॅनेजमेंटला काय सांगितलं?

या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सच प्रदर्शन खूप खराब झालं. स्वत: कॅप्टन हार्दिक पांड्या काही खास करु शकला नाही. मैदानात हार्दिकच्या काही निर्णयांनी अनेकांना हैराण केलं. टीममधल्या सिनिअर खेळाडूंनी हार्दिकच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलय. त्यामुळे ड्रेसिंग रुममध्ये उत्साह नव्हता असं टीम मॅनेजमेंटला सांगितलं. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिलय.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

हार्दिकची कोणी तक्रार केली?

मुंबईच्या एका सामन्यानंतर खेळाडू आणि कोचिंग स्टाफची भेट झाली. यात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराहसारखे सीनिअर सदस्य होते. या खेळाडूंनी टीमच्या खराब प्रदर्शनाची कारण कोचिंग स्टाफसमोर ठेवली. या मीटिंगनंतर सिनिअर खेळाडूंशी स्वतंत्र चर्चा झाली. तिथेही याच गोष्टी समोर आल्या. हे वृत्तात म्हटलं आहे.

मुंबई इंडियन्सच्या अधिकाऱ्याने काय म्हटलय?

टीममध्ये लीडरशिपच कोणतही संकट नाहीय, असं मुंबई इंडियन्समधील एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटलय. टीमला बऱ्याच काळापासून रोहितच्या नेतृत्वाखाली त्याच्या स्टाइलमध्ये खेळण्याची सवय होती. अशावेळी बदल झाल्यानंतर नव्या कॅप्टनच्या कार्यपद्धतीशी जुळवून घ्यायला वेळ लागतोय असं या अधिकाऱ्याने म्हटलं.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता