‘मोदी साहेब… जनता खूप हुशार महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही’ पवारांचं थेट मोदींना चॅलेंज

0

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्रातील जाहीर सभांमधून पवार-ठाकरेंवर निशाणा साधत आहेत. अशावेळी आता पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. हे प्रत्युत्तर स्वत: शरद पवार यांनीच दिलं आहे. ‘महाराष्ट्राच्या, देशाच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे तुम्ही दुर्लक्ष केलं.. तर हा महाराष्ट्र बोलणार नाही.. पण ज्या दिवशी संधी मिळेल त्या वेळेला महाराष्ट्राचा हिसका तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही.  ती आम्हा लोकांची तयारी आहे.’ असं शरद पवार हे कोल्हापुरातील सभेत म्हणाले.

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देऊ केली आहे. काँग्रेसच्या तिकीटावर लढणाऱ्या शाहू महाराजांच्या प्रचारासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आज (1 मे) कोल्हापुरात जाहीर सभा घेतली. याच सभेत शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना थेट चॅलेंज दिलं आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

पाहा कोल्हापूरच्या सभेत शरद पवार नेमकं काय म्हणाले.. 

‘इथे देशाचे पंतप्रधान येऊन गेले.. अनेक ठिकाणी येऊन गेले. हल्ली महाराष्ट्रात जाण्यासाठी त्यांना दुसरं काही दिसत नाही.. चांगली गोष्ट आहे.. या आम्ही तुमचं स्वागत करतो. इथे आल्यानंतर त्यांनी काही गोष्टी बोलून दाखवल्या..’ ‘देशाचे पंतप्रधान एखाद्या राज्यात जात असतील तर जनतेला संबोधित करतात. आम्ही लोकांनी एका काळामध्ये पाहिलंय की, पं. जवाहरलाल नेहरू हे राज्यांमध्ये जात असत.. नेहरू लोकांना या देशात उभारणी कशी करणार याबाबत मार्गदर्शन करायचे.’

‘इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान म्हणून अनेक वेळेल्या राज्यामध्ये जायच्या आणि राज्यातील लोकांची गरीबी ही कशी घालवणार यासंबधीची विचार त्या मांडायच्या.. हे काम प्रत्येक पंतप्रधानाने केलं. पण आजचे पंतप्रधान महाराष्ट्रात येतात.. तेव्हा त्यांना दोन लोकांची आठवण ही प्रकर्षाने होते.’

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार