एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवारांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची बातमी समोर येत आहे. राजगड येथे त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं समजतं आहे.
हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने शरद पवार आणि सुप्रिया सुळे, हेलिकॉप्ट मधून उतरून बाय रोड पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याचं सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजगडनंतर शरद पवार यांची सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ खडकवासला मतदार संघातील वारजे येथे सभेसाठी हेलिकॉप्टरने जाणार होते. मात्र त्यामध्ये तांत्रिक बिघड झाल्यानं चारचाकी गाडीने पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने हेलिकॉप्टर पाहण्यासाठी स्थानिकांची हेलिपॅडवर मोठी गर्दी केली आहे. याचा व्हिडीओही समोर आला आहे.