भाजपची दुसरी यादी जाहीर; जनाधार अन् लोकाश्रयाचे पंकजा मुंडे, मुरलीधर मोहोळसह 20 उमेदवार जाहीर

0

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील वीस नेत्यांचा या यादीमध्ये समावेश आहे. पंकजा मुंडे, नितीन गडकरी, सुधाकर शृंगारे, हिना गावित, पियुष गोयल, मुरलीधर मोहोळ या नेत्यांचा यादीमध्ये समावेश आहे. पारंपरिक जनाधार अन भक्कम बालेकिल्ले असलेल्या नेतृत्वाला संधी देण्याचं या यादीतून सिद्ध होत आहे याबरोबरच मित्र पक्षांनी यापैकी कोणत्याही मतदारसंघावर ती दावा न केल्यामुळे हे भाजपाच्या वाट्याला आलेले वीस लोकसभा मतदारसंघ निवडण्यात आले आहेत.

नंदुरबारमधून डॉ. हिना गावित, धुळ्यातून सुभाष भामरे, जळगावमधून श्रीमती स्मिता वाघ, रावेतमधून रक्षा खडसे, अकोल्यातून अनूप धोत्रे, वर्ध्यातून रामदास तडस, नागपूरमधून नितीन गडकरी, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, नांदेडमधून प्रतापराव चिखलिकर, जालन्यातून रावसाहेब दानवे यांच्या नावाचा समावेश आहे.

अधिक वाचा  महामानव विचार मंच संस्थेच्या वतीने ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात संपन्न

डिंडोरीतून भारती पवार, भिवंडीतून कपिल मोरेश्वर पाटील, मुंबई उत्तरमधून पियूष गोयल, मुंबई उत्तर पूर्वमधून मिहिर कोटेचा, पुण्यातून मुरलीधर मोहोळ, बीडमधून पंकजा मुंडे, अहमदनगरमधून सुजय विखे पाटील, लातूरमधून सुधाकर श्रृंगारे, माढ्यातून रणजीतसिंह निंबाळकर, सांगलीतून संजयकाका पाटील यांना संधी देण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारी जाहीर करताना काही मोठे निर्णय घेण्याची शक्यता होती परंतु भारतीय जनता पक्षाने ही महाराष्ट्रात सध्या सुरू असलेले मराठा व आंदोलनाचे वातावरण लक्षात घेऊन या समाजाला जास्तीत जास्त प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न  केल्याच यातून दिसत आहे. महाराष्ट्र मध्ये भारतीय जनता पक्षाला जर मोठा विजय साखरेचा असेल तर मराठा आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या समुदायाला योग्य संधी देणे ही गरज लक्षात घेऊन आज जाहीर करण्यात आलेल्या नावांमध्ये किमान 80 टक्के ही मराठा समाजातील नेतृत्व असल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे.

अधिक वाचा  बाल्कनीतील कपड्यांवर निर्बंध घालण्यापूर्वी पुणे महापालिकेने कचरा व्यवस्थापनातील त्रुटी दूर कराव्यात: पतित पावन संघटनेची मागणी