LIVE मॅचमध्ये राडा; हार्दिक पांड्याच नाव घेताच चाहत्याला लाथा-बुक्क्यानी मारहाण

0
1

मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या मैदानात उतरताच हूटिंग सुरु होते. हार्दिक पांड्या सोशल मीडियावर सतत ट्रोल होतोय. पांड्या जिथे जातो, तिथे विरोध सुरु होतो. त्याने मुंबई इंडियन्सची कॅप्टनशिप संभाळल्यापासून काहीच चांगलं होत नाहीय. आता परिस्थिती इतकी वाईट झालीय की, हार्दिक पांड्याच नाव घेणाऱ्याला स्टेडियममध्ये मारहाण होत आहे. आयपीएल 2024 मध्ये एका सामन्यादरम्यान असच एक प्रकरण समोर आलय. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यात एक व्यक्तीला निर्दयतेने मारहाण सुरु आहे. असं सांगितलं जातय की, ज्याला मारहाण होतेय, तो हार्दिक पांड्याचा फॅन आहे आणि मारहाण करणारे रोहित शर्माचे फॅन आहेत.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले

रिपोर्ट्सनुसार नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्समध्ये सामना झाला. त्यावेळी स्टेडियममध्ये एका व्यक्ती हार्दिक पाडंयाच समर्थन करत होता. त्याची रोहित शर्माच्या फॅन्स बरोबर वादावादी झाली. थोड्याचवेळात प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचलं. हार्दिक पांड्याच्या चाहत्याला निर्दयतेने मारहाण करण्यात आली.

इथूनच सर्व गणित फिसकटलं

मागची दोन वर्ष हार्दिक पांड्याचा आयपीएलमध्ये एक वेगळा रुबाब होता. तो गुजरात टायटन्सचा कॅप्टन होता. पहिल्या सीजनमध्ये त्याने टीमला चॅम्पियन बनवलं. मागच्या सीजनमध्ये तो गुजरातच्या टीमला फायनलपर्यंत घेऊन गेला. आयपीएल 2024 च्या आधी मुंबई इंडियन्सने त्याचा टीममध्ये समावेश केला. त्याला कॅप्टन बनवण्यात आलं. पण इथूनच सर्व गणित फिसकटण्यास सुरुवात झाली.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

पॉइंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम कितव्या स्थानावर?

रोहित शर्माला असं तडकाफडकी कॅप्टनशिपवरुन हटवण्याचा निर्णय चाहत्यांना अजिबात पटला नाही. आता प्रत्येक ठिकाणी हार्दिक पांड्याचा विरोध सुरु आहे. मुंबई इंडियन्सने या सीजनमध्ये खूपच खराब प्रदर्शन केलय. मुंबई इंडियन्सच्या टीमने 8 पैकी 5 सामने गमावलेत. पॉइंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम 8 व्या स्थानावर आहे. रोहितच्या जागी हार्दिकला कॅप्टन बनवण्याचा निर्णय मुंबई इंडियन्सला खूप महाग पडलय.