कोथरूड शिवसेनेला धक्के सुरूच; शाखाप्रमुख, 3 वेळा उपविभाग प्रमुख बाप्पूचा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र

0
1

भारतीय जनता पक्षाचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी कोथरूड शिवसेनेला खिंडार पडले असून शिवसेनेमध्ये सक्रिय असलेले अन् मुरलीधर अण्णा मोहोळ यांचे जुने सहकारी कोथरूड शिवसेना उपविभाग प्रमुख लक्ष्मीकृपा अर्बन बँकेचे संचालक बाप्पू चव्हाण यांनी आज उच्च शिक्षणं व तंत्रज्ञान मंत्री पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. पुणे शहर अध्यक्ष धीरजजी घाटे यांच्या हस्ते त्यांचे महाविजय रथामध्ये स्वागत करण्यात आले.

बाप्पू चव्हाण यांनी मुळातच सामाजिक सेवेचा वसा हा जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचारधारेतून घेतला होता. मुरलीधर मोहोळ हे शाळेतील मित्र असून या मित्राला पुणे शहरातील नेतृत्व करण्याची संधी मिळाली ही मोठी बाब आहे. सामाजिक व राजकीय वाटचालीत शिवसेना आणि भाजप ही कायम एकत्र राहणारे पक्ष होते परंतु काही कारणास्तव राज्यांमध्ये झालेल्या उलथापालथी यामुळे आपल्या मित्राला ह्या मोक्याच्या काळामध्ये मदत करण्यास पक्षाची बंधने लक्षात घेऊन फक्त मैत्री आणि मैत्रीसाठी आपली कृती या भूमिकेतूनच सामाजिक वारसा जपत कोणत्याही पदाची अपेक्षा न करता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

प्रभाग 13 मध्ये परिसरातील गणेशनगर, पूरग्रस्त वसाहत भालेकर चाळ आणि एरंडवण्याच्या भागामध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेत समाजसेवा करण्याचं व्रतच घेतलं होतं. सामाजिक काम करत असताना मुरलीधर मोहोळ यांच्याबरोबर सलोखा राहिल्यामुळे कायम मैत्री जपली होती. मुरलीधर मोहोळ यांनीही खूप स्थानिक पातळीवरून पक्षाच्या कामाला सुरुवात केली त्याचा मी साक्षीदार आहे. त्यांनीही वॉर्ड अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष, पुणे शहर युवा मोर्चा अध्यक्ष आणि भाजपा कडून 22 वर्ष सभासद अशी पदे भुषवली त्याकाळात त्यांच्याबरोबर मित्र म्हणून कायमच साथ देण्याचे भाग्य मिळाले. आपल्या मित्राला मदत करण्याच्या वैचारिक कारणास्तव शिवसेना पक्षाच्या कार्यकारणी पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अन्य पक्षात काम केले परंतु मुळात जनसंघाची घडण आणि आज आपला जिवलग मित्र पुणे शहरातील महत्त्वाची निवडणूक लढत असताना त्यांच्याबरोबर राहणं या भूमिकेतून बाप्पू चव्हाण यांनी हा निर्णय घेतला आहे.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार 

बाप्पू चव्हाण यांची मुळातच ओळख ही कायम जनसंपर्कात राहत एक ‘सक्रिय कार्यकर्ता’ ही आपली भूमिका कायमच जपत जनसेवेत आपलं महत्त्व आबादीत ठेवण्याचं काम केलं. कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये मुरलीधर मोहोळ यांना मिळालेली उमेदवारी ही बाप्पू चव्हाण यांच्यासाठी एक नवी पर्वणी असून प्रभाग 13 मध्ये भारतीय जनता पक्षाचे व्यक्तिगत लक्ष घालून काम करण्यासाठी बाप्पू चव्हाण यांच्या रूपाने एक हक्काचा आणि आण्णांच्या घरातील माणूस पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला मिळाल्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीमध्ये कोथरुड कार्यकारणीसाठी ही फायद्याचे ठरणार आहे.

सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी बाळासाहेब यांच्या प्रेरणेने आजपर्यंत कायम जनसेवेत राहत आयुष्य अर्पण केले आहे. या वैचारिक कारणामुळे भारतीय जनता पक्ष आणि संघाच्या विचारधारेत समाविष्ट झालो आहे. ‘जनसेवा’ या हेतूने शिवसेनेतही उपविभाग प्रमुख म्हणून काम चालू होते. पहिल्यापासून हिंदुत्वाचे काम करत असल्याने पुन्हा सक्रिय होण्याचा निश्चय केल्यामुळे आज भाजपा प्रवेश केला असून आपल्या भागात जास्तीत जास्त भाजपाला(जिवलग मित्राला) मताधिक्य देण्याचे काम करणार असल्याचेही बाप्पू चव्हाण यांनी न्यूजमेकर.लाईव्हशी संवाद साधताना सांगितले.

अधिक वाचा  सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शिवसेनेशी युती; मा. आनंदराज आंबेडकरांची भूमिका स्पष्ट झाली