टीम इंडियाचा अनुभवी ऑलराउंडर आर अश्विन याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत क्रिकेट चाहत्यांना मोठा झटका दिला. अश्विनच्या या निर्णयामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा झटका लागला. त्यानंतर आता आणखी एक मोठी आणि भारताला झटका देणारी बातमी समोर आली आहे. विराट कोहलीही भारताची साथ सोडणार असल्याची अपडेट समोर आली आहे. विराटचे कोच राजकुमार शर्मा यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
विराट कोहली गेल्या अनेक वर्षांपासून अनेक मालिकांनंतर लंडनमध्ये कुटुंबासोबत असायचा. विराट आता कायमचा लंडनवासी होणार आहे. विराटचे लहानपणीचे कोच राजकुमार शर्मा यांनी याबाबतची माहिती दिली आहे. विराट सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळवण्यात येत असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेत आहे. विराटसोबत त्याची पत्नी अनुष्का शर्माही आहे. विराट त्याची पत्नी अनुष्का आणि मुलांसह कायमचाच लंडनवासी होणार आहे, असं राजकुमार शर्मा यांनी एका मुलाखतीत सांगितलं.
विराट कायमसाठी भारत सोडून लंडनमध्ये स्थायिक होणार आहे का? असा प्रश्न राजकुमार शर्मा यांना मुलाखतीत विचारला. विराट लंडनमध्ये स्थायिक होण्याच्या तयारीत आहे आणि लवकरच असं होईल, असं उत्तर शर्मा यांनी दिलं.
विराटच्या निवृत्तीबाबत काय म्हटलं?
शर्मा यांना विराटच्या निवृत्तीबाबतबी प्रश्न करण्यात आला. विराट बॉर्डर गावसकर ट्रॉफीनंतर निवृत्त होणार का? या प्रश्नावर शर्मा यांनी नाही असं म्हटलं. “विराट अजूनही फिट आहे. विराटचं निवृत्तीचं वय झालेलं नाही. विराट आणखी 5 वर्ष खेळू शकतो. मी विराटला तो 10 वर्षांपेक्षा लहान होतो तेव्हापासून ओळखतोय. विराटमध्ये आणखी खूप क्रिकेट आहे”, असं शर्मा यांनी म्हटलं.