शरद पवार पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित ; गॅस सिलेंडर 500 रुपयांना देणार तर कंत्राटी भरती बंद… जाणून घ्या थोडक्यात

0

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचा लोकसभा निवडणूक 2024 साठी शपथनामा आज प्रसिद्ध करण्यात आला. या कार्यक्रमाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार वंदना चव्हाण, युवक प्रदेशाध्यक्ष मेहमबूब शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे,पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप या कार्यक्रमाला उपस्थित होते. जयंत पाटील यांनी शपथनाम्यात कोणत्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे या संदर्भातील माहिती दिली आहे.

जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा लोकसभा निवडणुकीसाठीचा शपथनाम्यातील काही गोष्टी वाचून दाखवल्या. शपथपत्रातील प्रमुख गोष्टी

– स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती करुन 500 रुपयांवर आणणार

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

पेट्रोल आणि डिझेलवरील कराची फेररचना, महागाई रोखण्यासाठी प्रयत्न

– केंद्राकडील 30 लाख रिक्त जागांवर भरती करण्याचा आग्रह

-महिलांना शासकीय नोकऱ्यात 50 टक्के आरक्षण

-जीएसटीला मानवी चेहरा देण्याचा प्रयत्न करणार

– शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत देणार

– शासकीय सेवेतील कंत्राटी कामगार पद्धत बंद करणार

-जातनिहाय जनगणना करण्यासाठी आग्रह करणार

-आरक्षणावरील 50 टक्केची मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्न करणार

– खाजगी कॉलेजमध्ये आरक्षण ठेवण्याचं काम करणार

– जेष्ठ नागरिकांसाठी आयोगाची स्थापना करणार

– आरोग्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करणार

– शिक्षणासाठी अर्थसंकल्पीय तरतूद 6 टक्क्यांपर्यंत करणार

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

– शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर शून्य टक्के जीएसटी आणणार

– खाजगीकरणावर मर्यादा आणणार

– अग्निवीर योजना आम्ही बंद करणार

– वन नेशन आणि वन इलेक्शन चर्चा करणे आता योग्य नाही, आधी आहेत त्या इलेक्शन यंत्रणा सक्षम करू

– प्रत्येक गरीब महिलेला वार्षिक 1 लाख देऊ

– अंगणवाडी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवू

वंदना चव्हाण यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा तयार करण्यात आला. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी लोकं जाहीरनामा तयार करणाऱ्या समितीत आहेत. पाच वर्षांसाठी आमचे खासदार निवडून जातील, त्यांना हे विषय कमी पडतील, असं वंदना चव्हाण म्हणाल्या. महिला आणि मुली, शेतकरी, कामगार, दिव्यांग, तृतीयपंथी यांच्यासाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. शेतकरी, नागरी विकास, आरोग्य, पर्यावरण यासाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. यामध्ये पर्यटन, राष्ट्रीय सुरक्षा हे मुद्दे घेण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा