‘सारथी’मार्फत प्रशिक्षणावर ‘कॅप’चे निर्बंध; 5000 विद्यार्थ्यांना फटका, ‘कोचिंग क्लास’च्या स्वातंत्र्याला ब्रेक

0

राज्य सरकारने इतर सर्व संस्थामध्ये समान धोरण असावे, या हेतूने स्थापन केलेल्या उपसमितीत सारथी संस्था समाविष्ट आहे. या उपसमितीत टीआरटीआय, बार्टी संस्थाप्रमाणे सारथी धोरण राबवताना दिसत नाही.याउलट ‘सारथी’ मार्फत स्पर्धा परीक्षाचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर प्रशिक्षण संस्था निवडताना ‘कॅप’चे निर्बंध लावले आहेत. त्याचा फटका ५ हजार विद्यार्थ्यांना बसणार आहे. त्याला विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे.

समान धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार योग्य तो कोचिंग क्लास निवडण्याचे स्वातंत्र्य प्रदान करणे आवश्‍यक आहे. परंतु ‘सारथी’ने जास्तीत जास्त २०० विद्यार्थी एका क्लासला या ‘कॅप’च्या धोरणानुसार, विद्यार्थ्यांचा संस्था निवडण्याचा हक्क हिरावून घेतला आहे. ‘सारथी’ने ही कॅपची अट काढून टाकावी व सर्व विद्यार्थ्यांना आवडती कोचिंग संस्था निवडण्याचा अधिकार द्यावा.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

कोचिंगवाल्यांची जाहिरात

विद्यार्थ्यांना मोफत टँब, तसेच अर्धी रक्कम परत देतो, क्लास नाही केला तरी चालेल, अशी जाहिरात कोचिंगवाले करू लागले आहेत. ज्या क्लासकडे विद्यार्थी जात नाहीत, त्यांना मुले मिळवून देण्यासाठी ‘कॅप’ चे निर्बंध लावले आहेत का? ‘सारथी’ने याबाबत परिपत्रक काढलेले नाही, मुलांना तोंडी आदेश दिले आहेत. कोट्यवधी रुपयांचे बिल असतात. त्याचा त्रास नको होईल म्हणून चांगले क्लासवाले बळी पडतात.

अशी आहे स्थिती…

-विद्यार्थ्याचे पैसे वेळेवर देत नाहीत

-अधिकारी तपासणीला येतात, क्लासवर कारवाई करतात.

-५००० विद्यार्थ्यांना फटका बसणार .

-साधारण ८० हजार रुपये प्रती विद्यार्थी क्लासला मिळतात

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

‍अट्टहास कशासाठी ?

‘बार्टी’, ‘टीआरटीआय’ या संस्थेमध्ये ‘कॅप’चा निर्णय नाही. मग सारथी का अट्टहास करतेय? हा निर्णय विद्यार्थ्यासाठी अन्यायकारक आहे. त्याला पसंतीनुसार कोचिंग मिळणार नाही? त्यामुळे बोगस क्लास की जिथे दर्जा व गुणवत्ता नसेल असा ठिकाणी जावे लागेल ? यामुळे त्याचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. ”कॅपचे धोरण अयोग्य आहे. अनेकांना मनासारखा कोचिंग क्लास मिळत नाही. ”

-योगेश पाटील, एमपीएससी विद्यार्थी

”विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी कॅप धोरणाचा पुनर्विचार करून विद्यार्थ्यांना योग्य ती प्रशिक्षण संस्था निवड करण्याची संधी द्यावी. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार क्लास असे निविदेत सांगतात आणि अचानक असे दुट्टपी निर्णय घेतात. कोचिंगवाल्याच्या लॉबीमुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान सारथी संस्था करत आहे.”

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

-ॲड. कुलदीप आंबेकर, अध्यक्ष स्टुडंट हेल्पिंग हॅन्डस असोसिएशन

” विद्यार्थ्याना कोचिंगक्लास निवडण्यासाठी ‘कॅप’चे धोरण अवलंबण्यास सांगितले आहे. कोचिंग क्लासची प्रवेश क्षमता पाहून प्रवेश देणार आहे. कोणा एका क्लासवर भार येणार नाही. ”

-संजीव जाधव, सारथी निबंधक