मी रडून मतदान मागणार नाही, गोपीनाथ मुंडे व्हायची माझी औकात नाही, मला पंकजा मुंडेच राहू द्या असं भावनिक वक्तव्य बीडच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी केलं. यावेळी भावनिक झालेल्या पंकजा मुंडे यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. मला बीडमधून उमेदवारी मिळाल्यानंतर प्रितम मुंडेंचं काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे, पण प्रीतम मुंडे यांची काळजी करू नका, मी तिला नाशिकमधून उभी करेन असं मोठं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलंय. बीडमध्ये लोकसभेच्या प्रचारासाठी आयोजित सभेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.






प्रितम मुंडेंना मी विस्थापित करणार नाही, तिचं कुठेही अडणार नाही, मी तिला नाशिकमधून उभी करेन असं पंकजा मुंडे म्हणाल्या. प्रितम मुंडेंचं राजकारण हे गोपीनाथ मुंडेंच्या पश्चात झालं आहे, मी तर गोपीनाथ मुंडेंचा हात बनले होते असंही त्या म्हणाल्या.
मी प्रितम मुंडेंसाठी तिकीट मागत होते, पण मलाच तिकीट घ्या असं वारंवार सांगितलं गेलं. त्याचं कारण आता मला समजलं, ही देशाची निवडणूक आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या.










