अमेठी की रायबरेली? राहुल गांधींनी दिले हे उत्तरं; ‘चॅम्पियन ऑफ क….’ पंतप्रधान मोदींना दिली नवी उपाधी

0

उत्तर प्रदेशातील दोन लोकसभा मतदारसंघांकडे देशातील जनतेचे लक्ष लागले आहे. ते म्हणजे, गांधी घराण्याचे पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखले जाणारे अमेठी आणि रायबरेली. सध्या अमेठीच्या विद्यमान खासदार आहेत स्मृती इराणी. मागील निवडणुकीत त्यांनी राहुल गांधींचा पराभव केला होता. तर रायबरेलीच्या खासदार आहेत सोनिया गांधी. पण यावेळी त्या काँग्रेसच्या उमेदवार नसतील. त्यामुळे दोन्ही मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार कोण असणार, याची उत्सुकता शिगेला पोहचली.

राहुल गांधींनी काही दिवसांपुर्वीत सध्या ते प्रतिनिधित्व करत असलेल्या केरळातील वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पण ते अमेठी किंवा रायबरेलीतूनही उभे राहणार का, याबाबत अजूनही काँग्रेसकडून काहीच संकेत देण्यात आलेले नाहीत. याबाबत आज राहुल गांधींना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

रायबरेली किंवा अमेठीतून निवडणूक लढणार का, या प्रश्नावर उत्तर देताना राहुल म्हणाले, ‘काँग्रेस निवडणूक समिती आणि काँग्रेसचे अध्यक्ष जे मला सांगतील ते मी करेन. असे निर्णय आमच्या निवडणूक समितीमध्ये होतात.’ राहुल यांच्या या उत्तरामुळे दोन्ही मतदारसंघातून सस्पेन्स पुन्हा वाढला आहे. मागील निवडणुकीत इराणींनी राहुल यांचा 55 हजार मतांनी पराभव केला होता.

दरम्यान, राहुल यांनी आज समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासोबत एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीला मोठी संधी असल्याचे सांगत भाजप केवळ 150 जागांपर्यंतच विजय मिळवू शकेल, असा दावा केला. मागील 15 ते 20 दिवसांपर्यंत मला वाठत होते की, भाजपला 180 च्या जवळपास जागा मिळतील. पण आता 150 जागा मिळू शकतील, असे वाटते. उत्तर प्रदेशातही आमची कामगिरी चांगली राहील, असा विश्वास राहुल यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

चॅम्पियन ऑफ करप्शन
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना राहुल यांना त्यांचा उल्लेख चॅम्पियन ऑफ करप्शन असा केला. इलेक्ट्रोरल बॉण्ड योजना जगातील सर्वात मोठी खंडणी योजना असल्याची टीकाही त्यांनी केली. पारदशर्कतेसाठी ही योजना आणल्याचे पंतप्रधान मोदी सांगतात. मग भाजपला कुणी निधी दिला, कोणत्या तारखेला दिला ही माहिती का लपवली जात आहे, असा सवालही राहुल यांनी केला.