कोल्हापुरमध्ये मोठी घडामोड; मविआ महायुती दोघांची मनधरणी कामी जाहीर माघारही पाठिंबा मात्र गुलदस्त्यात!

0

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून गेल्या दोन वर्षांपासून तयारी करत असलेले गोकुळचे संचालक डॉ.चेतन नरके यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. पक्षाशिवाय ही निवडणूक लढवणे शक्य नसल्याचे सांगत त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याची घोषणा केली. मात्र पुढील काळात आपण राजकारणात सक्रिय होणार असल्याची घोषणा देखील यावेळी नरके यांनी केली.

गेल्या दोन वर्षांपासून गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके हे निवडणुकीची तयारी करत होते. कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची सुरू होते. महाविकास आघाडी कडून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची त्यांची इच्छा होती. शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांना उमेदवारी मिळण्याचे संकेतही होते. मात्र महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटल्याने त्या ठिकाणी शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात आली. तरीही अपक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी तयारी दर्शवली होती. सध्या महायुती आणि महाविकास आघाडीतील दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यावर आज गोकुळचे संचालक नरके यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

सामान्य जनता माझा पक्ष आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे विकास व्हिजन घेऊन मी लोकसभेच्या रिंगणात राहणार असल्याची घोषणा केली होती. आजही आपली इच्छा आहे. मात्र पक्षीय ताकद महत्वाची आहे. 7 मे रोजी मतदान होईल. पण 8 मे पासून पुन्हा मी मैदानात, राजकारणात मी सक्रिय असेन, असेही नरके यांनी स्पष्ट केले.

महायुती आणि आघाडीकडून संपर्क

गेल्या पंधरा दिवसात नरके यांच्याकडे महाविकास आणि महायुतीतील काही नेत्यांनी संपर्क केला आहे. काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी देखील नरके यांची दोन वेळा भेट घेतल्याची खात्रीलायक माहिती आहे. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील नरके यांच्याशी संपर्क साधला आहे. निवडणुकीतून माघारी घेत असताना त्यांनी कोणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवलं नसले तरी त्यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे. लवकरच त्याबाबतची घोषणा केली जाईल असेही नरके यांनी सांगितले आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

सुरेश भट यांची कविता म्हणत त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली.

” विझलो आज जरी मी,

हा माझा अंत नाही…

पेटेन उद्या नव्याने,

हे सामर्थ्य नाशवंत नाही…

छाटले जरी पंख माझे,

पुन्हा उडेन मी.

अडवू शकेल मला,

अजून अशी भिंत नाही…

माझी झोपडी जाळण्याचे,

केलेत कैक कावे…

जळेल झोपडी अशी,

आग ती ज्वलंत नाही…

रोखण्यास वाट माझी,

वादळे होती आतूर…

डोळ्यांत जरी गेली धूळ,

थांबण्यास उसंत नाही…

येतील वादळे, खेटेल तुफान

तरी वाट चालतो…

अडथळ्यांना भिवून अडखळणे,

पावलांना पसंत नाही…”

-सुरेश भट

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती