तुम्हाला मोदींची हवा लागलीय; संजय राऊतांचा श्रीकांत शिंदेंवर हल्लाबोल

0
1

मिंधेसरकारचे बाळराजे आहेत, त्यांना लिहिता वाचता येतं ना, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. श्रीकांत शिंदे यांच्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, ते नक्की सुशिक्षित आहेत ना, बाळराजेंना लिहिता वाचता येतं ना, ते हाड वैद्य आहेत, त्यांनी कधी माणसांची की जनावरांची हाड तपासली, ते पाहा. मला जेव्हा न्यायालयाने सोडलं, तेव्हा जे निकाल पत्र दिलं आहे, ते त्यांनी वाचायला पाहिजे, मग कोण कसे घोटाळे करतात आणि राजकीय दृष्टिकोनाने कसं कोणाला अडकवलं जातं, हे बाळराजेंना कळेल.

अडीच वर्षात 100 कोटींची उधळपट्टी

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार

श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून आतापर्यंत 500 ते 600 कोटी रुपये गोळा करण्यात आले, त्याबद्दस त्यांनी सांगावं. त्यांच्या दहा वर्षातली मुख्यत: अडीच वर्षातली जी काही उधळपट्टी आहे, ती 100 कोटींच्या वर आहे. सातपुते यांनी जी तक्रार केली आहे, त्यावर आपण का बोलत नाही, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. हसायचं की रडायचं, पत्राचाळ आरोपी आता पत्र लिहायला लागलं आहेत, असं वक्तव्य करत श्रीकांत शिंदेंनी राऊतांवर टीका केली होती.

तुम्हाला मोदींची हवा लागली, इधर-उधर की बाते

नरेंद्र मोदींची तुम्हाला हवा लागली आहे का, इधर-उधर की बात करो, असं म्हणत राऊतांनी श्रीकांत शिंदेसह मोदींवरही निशाणा साधला आहे. तुम्हाला हे पैसे कोणी दिले, त्या देणगीदारांची नावे जर तुम्ही देणार नसाल तर, आम्ही देऊ आणि त्या बदल्यात सरकारने त्यांची कोणती कामं केली एक नंबर आणि दोन नंबरची. त्यांनी खाजवायला माणसं ठेवली आहे, त्यांनी खाजवत बसावं, असंही राऊत म्हणाले आहेत.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

विशाल पाटीलांसोबत पुन्हा संवाद साधण्याचा प्रयत्न

विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करण्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले आहेत की, लोकशाहीमध्ये या देशात कोणीही निवडणूक लढू शकतो, विशाल पाटील हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत, ज्यांनी कधीच काँग्रेसशी कधीच बेईमानी केली नव्हती, उमेदवारी हा वेगळा विषय आहे. काँग्रेसची जी काही परंपरा आहे, ती परंपरा तोडून ते काही वेगळी भूमिका घेणार नाहीत, विशाल पाटील हे चांगले कार्यकर्ते आहेत, नक्कीच आम्ही पुन्हा त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू, असं राऊतांनी सांगितलं आहे.

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ

लवकरच महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार

एक-दोन दिवसात महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध होईल, अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे. आज आम्ही शिवसेनेच मशाल गीत लोकांसमोर आणणार आहोत, पुढल्या काही दिवसात आमचा जाहीरनामा, वचननामा आम्ही प्रसिद्ध करू, असंही राऊतांनी सांगितलं आहे.