‘चला-शाळेत जाऊ या! विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत

0
1

काल दि. १६ जुन २०२५ विश्रांतवाडी बॅ.विठ्ठलराव गाडगीळ प्राथमिक विद्यालय ,पुणे महानगरपालिका शाळा क्र. १११ येथे शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच शाळा प्रवेशोत्सव व शाळा पूर्वतयारी मेळावा साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात बौद्धिक, भावनिक, अंकज्ञान यावरील विविध खेळांचे माहिती शिक्षकांनी दिली.सर्व नवगतांचे स्वागत गुलाब पुष्प, चॉकलेट, खाऊ देऊन करण्यात आले. नवीन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे लक्ष्मीची पावले उमटून शाळेत स्वागत करण्यात आले. आलेल्या नवीन विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉइंट करण्यात आला होता व त्या सेल्फी पॉईंट मध्ये विद्यार्थी व पालकांनी सेल्फी घेतले. सर्व शिक्षा अभियान महाराष्ट्र शासन यांच्याकडून आलेली शालेय पाठ्यपुस्तक सुद्धा पाहिल्या दिवशी वाटप करण्यात आले.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी सर्व वर्गांमध्ये सजावट करण्यात आली होती व मुले आनंदाने शाळेत आज आली होती. विद्यार्थ्यांना आजचा दिवस खूपच आगळावेगळा वाटला. सदर कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते विनोददादा पवार,जितेंद्रभाऊ कराळेकर, प्रदिपभाऊ रावते,अँड मयुरदादा चव्हाण, पत्रकार नागेशभाऊ देडे इ उपस्थित होते.सदरच्या मा.नितीन वाणीसर यांनी मार्गदर्शन केले. शाळेच्या कार्यक्रमाचे नियोजन सर्व शिक्षकांनी केले. शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सुनीता जाधव शिक्षक नितीन वाणी,प्रदीप गवळी सुरेखा डफळ, स्वाती लोहकरे, कल्याणी गाडे,संजीवनी सोनार, पुजा घोगरे,सर्व विद्यार्थी व पालकांन मध्ये आनंदाचे वातावरण होते.

शाळेतील पायाभूत सुविधांच्या कमकुवततेबद्दल आम्ही शिक्षक वर्गाशी चर्चा केली मराठी शाळेची पट संख्या वाटणस योग्य ते कार्य केले करण्यात येईल. आम्हाला कळले की बेंच चांगल्या स्थितीत असे, शौचालयाची स्वच्छाता आणि विद्यार्थ्यांच्या हानी

अधिक वाचा  पुणे महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; शेवटचा दिवस; उत्तर आणि दक्षिण टोकावरील या प्रभागावर सर्वाधिक हरकती

आरोग्यस हानी होणार याची दक्षता, पिण्याच्या पाण्याची चांगली सुविधा होणे म्हणूनच आम्ही हा मुद्दा उपस्थित करण्याचा आणि शाळेतील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मनपा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटण्याचा निर्णय घेतला आहे कारण विद्यार्थी हे आपल्या देशाचे भविष्य आहेत.