भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोला 100 व्या मिशनमध्ये मोठा धक्का

0
1

सातत्याने यशाची कमान चढणाऱ्या भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोला 100 व्या मोहिमेमध्ये धक्का बसला आहे. 29 जानेवारीला इस्रोने NVS-02 उपग्रह लॉन्च केला होता. GSLV-Mk 2 रॉकेटद्वारे या उपग्रहाच यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं होतं. पण आता NVS-02 उपग्रहाला अपेक्षित कक्षेत स्थिर करण्यात अपयश आलं आहे. इस्रोकडून रविवारी ही माहिती देण्यात आली. भारत स्वत:ची नेव्हिगेशन प्रणाली विकसित करत आहे. त्यासाठी एनवीएस-02 उपग्रह खूप महत्त्वाचा होता. श्रीहरिकोटा येथील अवकाश तळावरुन या उपग्रहाच लॉन्चिंग झालं होतं. इस्रोची ही 100 वी मोहिम होती.

उपग्रहाच प्रक्षेपण यशस्वी झालं होतं. पण कक्षा वाढवण्याची जी प्रक्रिया असते, त्यात अपयश आलं. एनवीएस-02 उपग्रहातील थ्रस्टर्स प्रज्वलित होऊ शकले नाहीत, त्यासाठी उपग्रहाला अपेक्षित कक्षेत स्थापित करता आलं नाही, अशी इस्रोच्या वेबसाइवटर माहिती देण्यात आली आहे. थ्रस्टर्स प्रज्वलित होण्यासाठी आवश्यक असेलले ऑक्सीडायजरचे वाल्वच उघडले नाहीत, त्यामुळे उपग्रहाला अपेक्षित कक्षेत स्थापित करता आलं नाही.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!

पर्यायी मिशन रणनितीवर काम सुरु

सध्या एनवीएस-02 उपग्रह पृथ्वीभोवती GTO कक्षेत भ्रमण करत आहे. नेव्हिगेशन सिस्टिमसाठी ही कक्षा उपयोगाची नाही. उपग्रहाची बाकीची सिस्टिम व्यवस्थित काम करतेय. त्याचं भ्रमण सुरु आहे. नेव्हिगेशनसाठी उपग्रहाचा वापर करण्यासाठी पर्यायी मिशन रणनितीवर सुरु असल्याच इस्रोकडून सांगण्यात आलं आहे.

सामन्य ऊर्जा निर्मिती

GSLV रॉकेटने उपग्रहाला GTO कक्षेत स्थापित केल्यानंतर त्यावरील सौर पॅनलने आपलं काम व्यवस्थित सुरु केलं. सामन्य ऊर्जा निर्मिती झाली. ग्राऊंड स्टेशनसोबत कम्युनिकेशन सुरळीत आहे. जीएसएलव्ही द्वारे लॉन्चिंग यशस्वी ठरलं. अत्यंत अचूकतेने कक्षेत स्थापित करण्याबरोबर सर्व टप्प्यांवर योग्य पद्धतीने काम झालं होतं.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

भारतीयांना अनेक अभिमानाचे क्षण दिले

इस्रोने आतापर्यंत भारतीयांना अनेक अभिमानाचे क्षण दिले आहेत. इस्रोने मंगळ, चंद्र आणि सूर्य मोहिम सुद्धा यशस्वी करुन दाखवली आहे. दोन वर्षांपूर्वी भारताची चांद्रयान-3 मोहिम यशस्वी ठरली होती. चंद्रावर यशस्वीरित्या यान उतरवणारा भारत जगातील चौथा देश ठरला होता.