टेस्लाला श्याओमीच मोठं आव्हानं; स्वस्तात लाँच केली 700 किलोमीटर रेंजची इलेक्ट्रिक कार; किंमत फक्त..

0
1

काही दिवसांपूर्वी मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये श्याओमीने आपली बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक कार सादर केली होती. Xiaomi SU7 असं नाव असलेल्या या कारने संपूर्ण कार्यक्रमावर आपली छाप सोडली होती. ही कार कधी लाँच होते आणि तिची किंमत किती असेल याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागून होती. अखेर कंपनीने चीनमध्ये ही कार लाँच केली आहे.

किती आहे किंमत?

श्याओमीच्या या कारचे तीन व्हेरियंट लाँच करण्यात आले आहेत. यातील पहिल्या व्हेरियंटमध्ये 73.6 kWh बॅटरी देण्यात आली आहे. या व्हेरियंटची रेंज सुमारे 700 किलोमीटर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. याची किंमत 2,15,900 चिनी युआन (सुमारे 25 लाख रुपये) एवढी आहे.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार 

या कारचं दुसरं व्हेरियंट (Xiaomi SU7 Pro) तब्बल 830 किलोमीटरची रेंज देते असा दावा कंपनीने केला आहे. यामध्ये 94.3kWh बॅटरी देण्यात आली आहे. याची किंमत 2,45,900 युआन (सुमारे 28.5 लाख रुपये) एवढी आहे. तर याच्या टॉप मॉडेलमध्ये (Xiaomi SU7 Max) 101kWh बॅटरी देण्यात आली आहे. याची रेंज तब्बल 900 किलोमीटर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. याची किंमत 2,99,900 युआन (सुमारे 35 लाख रुपये) एवढी आहे.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा

कंपनीने जाहीर केलेल्या किंमती या चीनमधील आहेत. कंपनीने अद्याप भारतातील लाँच डेट किंवा भारतातील किंमती अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. काही दिवसांपूर्वीच टेस्लाला भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला होता. टेस्लाने देखील भारतात स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच करण्याची योजना आखली आहे. यातच श्याओमीला देखील भारतात कार लाँच करण्याची परवानगी मिळाली, तर दोन्ही कंपन्यांमध्ये चांगलीच टक्कर पहायला मिळेल.