महाराष्ट्र केसरी 2025 स्पर्धेला गालबोट लागले आहे. नांदेड डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ यांच्यात सामना रंगला होता. ज्यामध्ये शिवराज राक्षे याला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर पंचांचा निर्णय न पटल्याने महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने पंचांची कॉलर पकडत लाथ मारलीय. शिवराज राक्षे आणि पृथ्विराज मोहोळ यांच्यातील लढतीत पंचांनी मोहोळला विजयी घोषित केल्याने वाद झाला आहे.
शिवराज राक्षेचा पराभव झाल्यानंतर त्यांनी पंचाच्या निकालाविरोधात नाराज व्यक्त करीत त्यांना लाथ मारल्याचा प्रकार घडल्याने गोंधळ उडाला आहे. या प्रकरणात आता शिवराज राक्षेने आपला रिव्हूय दाखविण्यात यावा आणि माझे खांदे आणि पाठ टेकलेली असेल तर आपण स्वत:च कूस्ती सोडून बाहेर पडतो, असे तो म्हणाला. तर आम्हाला अंतिम निर्णय मान्य नसल्याचा पवित्रा राक्षे समर्थकांनी घेतला.
शिवराज राक्षे यांचे प्रशिक्षक काय म्हणाले?
त्यानंतर शिवराज राक्षे यांचे प्रशिक्षक म्हणाले, हे काका पवारचे पठ्ठे आहे. हा ट्रिपल महाराष्ट्र केसरीचा दावेदार होता. त्याने दोन्ही खांदे टेकले असते तर समोरच्याच्या विजय घोषित करण्यासाठी शंभर टक्के स्वत: हात वर करण्यासाठी आलो असतो. त्याने दोन्ही खांदे टेकले असते तर हा पराभूत झाला असता असे आम्ही मान्य केले असते. मी जर अपील टाकलं तर अगोदर माझं अपील चेक करणे आणि नंतर निर्णय देणे, असा नियम आहे. पण पंचांनी न बघता निर्णय देऊन टाकला. समोरच्याचा विजय घोषित केला. शिवराज पूर्ण चीत झाला नव्हता.
प्रशिक्षक काका पवार म्हणाला?
खरंतर, पंचानी जर निकाल चुकीचा दिला असेल तर राग येऊ शकतो. कारण पोर मेहनत करतात, आणि आता त्याचे वर्षे वाया गेले. वर्षभर तयारी केलेली असते त्या रागातून असे घडू शकते असे ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षक काका पवार यांनी म्हटले.