मांजरी – मांजरी येथील मनपा अनाजी वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प आणि वह्या पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले.
काल शाळेच्या पहिल्या दिवशी मांजरी येथील अनाजी वस्ती मनपाच्या शाळेत चिमुकल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प आणि वह्या पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाल युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा शासन नियुक्त नगरसेवक अजित घुले, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर घुले, औदुंबर उकिरडे विभागीय अध्यक्ष माध्यमिक व उच्चमाध्यमिक मंडळ पुणे, शिवाजीराव अडागळे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी हडपसर विभाग, प्रतिभा जाधव समग्र शिक्षा समन्वयक, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक कर्मचार्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.