माढा लोकसभेत नवा ट्वीस्ट; शरद पवारांची साथ विश्वासू शिलेदार सोडणार? काहीही झालं तरी आता माघार नाही

0

माढा लोकसभा मतदारसंघात पुन्हा नवा ट्वीस्ट येण्याची शक्यता आहे. कारण, धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीची कुणकुण लागताच शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे अभय जगताप नाराज झाले आहेत. जगताप यांनी बंडाचे हत्यार उपसले असून लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष अर्ज भरुन निवडणूक लढवणार, असा इशारा दिला आहे. त्यामुळे माढ्यात शरद पवार गटासमोर नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

माढा लोकसभा मतदारसंघ गेले दिवस महायुतीमधील नाराजीच्या चर्चांनी गाजला आहे. या मतदारसंघातून भाजपने (BJP)रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या उमेदवारीला मोहिते-पाटील आणि नाईक निंबाळकर घराण्याने विरोध दर्शवला आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी तर भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

धैर्यशील मोहिते हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. दुसरीकडे मोहिते पाटील यांच्या उमेदवारीची कुणकुण लागताच शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे अभय जगताप हे नाराज झाले आहेत.

पक्षासोबत एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्याला शरद पवार यांनी लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते करीत आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीच्या चर्चांवर अभय जगताप चांगलेच संतापले आहेत. काहीही झालं तर आता आम्ही माघार घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्यासंदर्भात अभय जगताप यांनी शुक्रवारी (ता. १२) माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची मोठी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यानंतर पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी न मिळल्याने अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

या बैठकीनंतर अभय जगताप यांनी माध्यमांसोबत संवाद देखील साधला. माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवारांनी आपल्या उमेदवारीबाबत निर्णय न घेतल्यास आम्ही अपक्ष निवडणूक लढवणार, असा इशाहा अभय जगताप यांनी दिला आहे. त्यामुळे शरद पवार गटासमोर नवा पेच उभा राहण्याची शक्यता आहे.