महायुतीमधील ‘या’ चार मतदारसंघामुळे जागावाटपाचा तिढा वाढला, वर्षावर पहाटे 3 वाजेपर्यंत बैठका

0

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये सुरु असलेला जागावाटपाचा तिढा काही सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रकिया सुरु झाली असतानाही जागावाटपाचा अंतिम निर्णय होत नसल्याचे चित्र आहे. महायुतीमध्ये एकूण 4 जागांवरून तिन्ही पक्षात संघर्ष पाहायला मिळत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर आणि अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी बैठकांवर बैठका सुरु आहे. तर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव , नाशिक (Nashik) आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या चार मतदारसंघामुळे महायुतीमधील जागावाटपाचा तिढा कायम आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

संभाजीनगरवर भाजप-शिंदेसेनेचा दावा…

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमधी जागावाटपाचा तिढा पाहायला मिळत आहे. भाजपकडून या जागेवर दावा केला जात आहे. तर, दुसरीकडे शिंदेसेना देखील हा मतदारसंघ सोडण्यासाठी तयार नसल्याचे चित्र आहे. शिंदे गटाकडून मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. तर, भाजपकडून भागवत कराड इच्छुक आहेत.

धाराशिव मतदारसंघावर तिन्ही पक्षाचा दावा…

धाराशिव लोकसभा मतदारसंघावर महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकाचवेळी दावा केला आहे. शिंदेसेना आणि राष्ट्रवादीत या मतदारसंघासाठी अधिक रस्सीखेच पाहायला मिळत आहे. तर भाजपने देखील दावा केला आहे. भाजपकडून सेवानिवृत्त आयएएस अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांच्या नावाची चर्चा आहे. तर, घड्याळ चिन्हावर परदेशी यांनी रिंगणात उतरवावे असे राष्ट्रवादी गटात चर्चा आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

नाशिक सर्वाधिक चर्चेचा मतदारसंघ…

महायुतीमध्ये जागावाटपात सर्वाधिक अडचणीचा ठरणारा मतदारसंघ म्हणून नाशिककडे पाहिले जात आहे. शिंदे सेना आणि राष्ट्रवादीत या मतदारसंघावर संघर्ष पाहायला मिळत आहे. शिंदे गटाकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना कामाला लागा अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. तर, आपल्या नावाची चर्चा थेट दिल्लीत झाल्याचा दावा राष्ट्रवादीचे छगन भुजबळ करत आहेत. अशात भाजपकडून देखील उमेदवाराची चाचपणी सुरूच असल्याची चर्चा आहे.

रत्नागिरी – सिंधुदुर्गसाठी उदय सामंत आग्रही…देण्याच्या हालचाली सुरु आहेत.

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून शिंदेसेना आणि भाजपात एकमत होत नसल्याचे चित्र आहे. ही जागा शिवसेनेला मिळावी यासाठी उदय सामंत आग्रही आहेत. कारण, उदय सामंत यांचा भाऊ किरण सामंत या मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, भाजपकडून नारायण राणे यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरु आहेत.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा