संजय काकडेंची पोस्ट; 100 नगरसेवकांचीही न्यारी गोष्ट चंद्रकांतदादांचा स्व-अनुभव पुण्याची उमेदवारी धोक्यात?

0
1

लोकसभा निवडणुकीसाठी आता सत्ताधारी महायुती आणि मविआघाडीतील घटक पक्षांकडून उमेदवारी जाहीर होत आहे. काही ठिकाणी तर प्रचाराचा धडका सुरू झाला आहे. असे असताना आता मविआबरोबरच महायुतीही काही ठिकाणच्या जाहीर उमेदवारांना बदलण्याची मागणी जोर धरत आहे. पुणे महापालिकेमध्ये एक हाती पाच वर्षे सत्ता उपभोगलेले माजी महापौर आणि 100 नगरसेवक यांचे झाकोळले नाते हळूहळू उघड होत माजी खासदार संजय काकडे यांनी जाहीरपणे उमेदवारी बदलाची केलेली मागणी पुण्यात हळूहळू जोर धरण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिल्यानंतर शहरातील वातावरण बदलले असले तरी जाहीरपणे कोणीही बोलत नसल्यामुळे शरद वेगळी चर्चा असल्याची कुणकुण मागील आठवड्यापासून सुरू होतीच! स्थानिक नगरसेवकांची गेली 3 दिवस पुणे शहर कार्यालयामध्ये बैठका सुरु आहेत परंतु संजय काकडेंची नवी भूमिका आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी गेले 3 दिवस कमी उपस्थितीचा घेतलेला अनुभव यामुळे भाजपश्रेष्ठी पुण्याची उमेदवारी बदलणार का? नवा सवाल उपस्थित होत आहे.

अधिक वाचा  पुणे महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; शेवटचा दिवस; उत्तर आणि दक्षिण टोकावरील या प्रभागावर सर्वाधिक हरकती

पुण्याच्या भाजप उमेदवाराबाबतही तसेच काही घडताना दिसत आहे. अद्याप उघडपणे तशी मागणी झालेली जरी नसली तरी, मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली जाऊ नये, यासाठी अगोदर पक्षातूनच झालेला विरोध दुर्लक्ष करण्यासारखा नाही. भाजपने जरी मुरलीधर मोहळ यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर केले असले, तरीही पक्षाने अजूनही विचार करावा अशी चर्चा असल्याचे समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी फेसबुकवर केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. किंबहूना त्यांच्या या पोस्टमुळे आता माढा आणि अमरावती पाठोपाठ पुण्यातही भाजपचा उमेदवार बदलण्याची मागणी होत असल्याचे जाणवत आहे.

अधिक वाचा  सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शिवसेनेशी युती; मा. आनंदराज आंबेडकरांची भूमिका स्पष्ट झाली

संजय काकडे यांची Facebook Post – 

https://www.facebook.com/share/p/SDQ6fRSmfAKvoAJo/?mibextid=xfxF2i

संजय काकडे नाराज असल्याच्या चर्चांमुळे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुण्यात त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. याप्रसंगी संजय काकडे यांनी आपले म्हणणे चव्हाण यांच्यासमोर मांडून, आपल्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहचतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे माझ्या वेदना व पुणे लोकसभेचे वास्तव मांडले. या मथळ्याने लिहिलेल्या पोस्टमध्ये संजय काकडे यांनी म्हटले की, ‘पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माझे मित्र माननीय श्री रवींद्र चव्हाण यांनी आज माझ्या निवासस्थानी माझी भेट घेतली. यावेळी मी माझ्या मनातील सर्व वेदना आणि माझ्या आयुष्यातील उमेदीची 10 वर्षे पक्षासाठी देऊन या काळात काय काय कामे केली हे त्यांना सविस्तराने सांगितले. तसेच, पुणे लोकसभा मतदार संघातील वास्तव स्थितीदेखील मी त्यांना सांगितली.’

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

याशिवाय ‘मी त्यांना सांगितलेल्या माझ्या वेदना आणि पक्ष हिताच्या सर्व गोष्टी आमचे वरिष्ठ नेते, मार्गदर्शक व केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मला या भेटी दरम्यान दिला. पक्षाचे वरिष्ठ नेते मला योग्य तो न्याय देतील आणि पुणे शहरासाठी योग्य तो निर्णय करतील ही आशा आहे.’ असंही काकडे म्हणाले.