सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीची घोषणा ‘या’ तारखेला होणार? राज्यात 7 टप्प्यात होणार मतदान

0

देशात आता लोकसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग 14-15 मार्चला लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2019 लोकसभा निवडणुकीप्रमाणेच 2024 ची निवडणुकही 7 टप्प्यात होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार एप्रिलचा दुसऱ्या आठवड्यात पहिल्या टप्प्याचं मतदान होऊ शकतं.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच पत्रकार परिषद घेईल. पुढच्या आठवड्याच्या बुधवारी किंवा गुरुवारी ही पत्रकार परिषद पार पडेल. निवडणूक आयोग सध्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी अनेक राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. सर्व राज्यांतील तयारीचा आढावा घेतल्यानंतरच आयोग निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील.

राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक

निवडणूक आयोगाचं पथक सध्या पश्चिम बंगालमध्ये आहे. त्यानंतर हे पथक उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मिरचा दौरा करेल. 13 मार्चपर्यंत हे पथक आपला दौरा पूर्ण करतील. निवडणूक आयुक्त सर्व राज्यातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी बैठका करत आहेत.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

आर्टिफिशियल इंटेलिजेंस तंत्रज्ञानाचा वापर

आगामी लोकसभा निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगआर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो. यासाठी निवडणूक आयोग एक विभागही स्थापन करत असून  हा विभाग सोशल मीडिया डिजिटल प्लॅटफॉर्मवर

चुनाव आयोग आगामी लोकसभा चुनावों के स्वतंत्र और निष्पक्ष संचालन के लिए आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) तकनीक का इस्‍तेमाल कर सकता है. इसके लिए आयोग एक विभाग भी बना सकता है, जो सोशल मीडिया और डिजिटल प्लेटफॉर्म पर चुकीची माहिती गोळा करुन ती दूर करण्याच काम करेल.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

राजकीय पक्षांच्या तयारीला वेग

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व राजकीय पक्ष तयारीाला लागले आहेत. निवडणुकीच्या  तारखांची घोषणा होण्यापूर्वी अनेक पक्षांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. सत्तारुढ भाजपने 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आम आमदी पार्टी, समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोकदलानेही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

महाविकास आघाडीचं ठरलं

महाविकास आघाडीमध्ये   जळगाव आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला आहे.  याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी सांगली आणि जळगाव लोकसभा मतदारसंघाची बैठक बोलावली आहे. हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ शिवसेना लढवण्याच्या तयारीत आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटासोबत राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा ही जागा लढवण्यासाठी आग्रही होते. मात्र आता जळगाव लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे लढवणार हे जवळपास निश्चित झाले आहे. हर्षल माने इथून शिवसेना ठाकरे गटाचे संभाव्य लोकसभा उमेदवार असतील.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गट काँग्रेस पक्षाला सोडणार असून त्याऐवजी शिवसेना ठाकरे गट सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा लढवण्यावर  महाविकास आघाडीचे नेत्यांमध्ये एकमत होत आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर श्रीमंत शाहू छत्रपती हे  महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार आहेत. शाहू महाराज हे काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवू शकतात तर सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू  विशाल पाटील हे लढण्याची शक्यता. तसंच पैलवान चंद्रहार पाटीलही इथून इच्छूक आहेत.