पुणे महापालिका ‘प्रशासक’राज सुरक्षारक्षकांची मनमानी सुरूच; उपअभियंत्याला गेटबाहेर ६ ते ७जणांची मारहाण

0

पुणे – सर्वसामान्य नागरिकांचा हक्काचे ठिकाण म्हणून पुणे महापालिकेला ओळखलं जातं परंतु या पुणे महानगरपालिकेवर सध्या कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांची मनमानी सुरू असून एखाद्या खाजगी आस्थापनेप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांची अवहेलना सुरू असतानाच काल या सुरक्षारक्षकाच्या समूहाने थेट पुणे महापालिकेच्या उपाभियंतालाच चक्क गेटच्या बाहेर गेल्यानंतर (पूर्वग्रह दूषित मनोवृत्तीने) मारहाण केली. पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर उपअभियंत्याला प्रवेश करताना ओळखपत्राबाबत चौकशी करून त्यानंतर आतमध्ये प्रवेश देण्यात आला. परंतु सर्व कार्यालयीन कामकाज पूर्ण केल्यानंतर याच सुरक्षारक्षकांनी पुन्हा शिवीगाळ करत मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर पडल्यानंतर समूहाने मारहाण करत पोलिसांच्या स्वाधीन करण्याचा अजब प्रकार केला.

मुख्य प्रवेशद्वारावर 3 तृतीयपंथी सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की सुरू केली परंतु विनयभंगासारखा गुन्हा दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन या अभियंत्याला घडलेला प्रकार सहन करण्याशिवाय पर्यायच उरला नाही. त्यानंतर मुख्य सुरक्षारक्षकांनी सुद्धा घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता थेट मारहाण करण्यास सुरुवात केली असून याबाबतच्या सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास याबाबतची खरी माहिती सर्वसामान्यांना मिळेल परंतु पुणे महापालिकेच्या वतीने यावर पडदा टाकण्याचे काम करण्यात येत आहे. ही घटना (ता. २४) दुपारी दीडच्या सुमारास घडली.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

याप्रकरणी गुन्हा दाखल होऊ नये यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व संघटनांनी मध्यस्ती करून या घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, या घटनेचा अहवाल अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सादर करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु हा अहवाल सादर होताना तरी मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले जाईल की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे. पुणे महापालिकेने ५० कंत्राटी सुरक्षा रक्षकांची भरती केली आहे. महापालिकेच्या नव्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर या तृतीय पंथी सुरक्षा रक्षकांना तैनात करण्यात आले आहेत परंतु त्यांच्याकडून चौकशीच्या नावाखाली जी वागणूक दिली जात आहे त्याचाही पुन्हा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

या उपअभियंता बरोबर घडलेली घटना या अगोदरही तीन ते चार महापालिका कर्मचाऱ्यांबाबत घडली असल्याची माहिती मिळत आहे. तृतीय पंथी सुरक्षा रक्षकाने ओळखपत्राची मागणी पुणे महापालिकेत प्रवेश करताना विचारण्याची गरज होती परंतु पुणे महापालिकेतून बाहेर पडताना झालेली मारहाण खरंच विचार करण्याची गरज आहे. याबाबत सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांच्याशी किमान तीन ते चार वेळा संपर्क करण्यात आला परंतु त्यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही.

त्यानंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गेल्यानंतर घटनेचे खरे वास्तव लक्षात आले. पण महापालिकेतील काही वरिष्ठ अधिकारी हेतू: हा सीसीटीव्ही फुटेज जाहीर न करता या प्रकरणावर ती पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. कामगार संघटनांनी गुन्हा दाखल करू नये यासाठी दबाव आणल्याने कारवाई टळली असली तरी यासंदर्भात उपायुक्त प्रतिभा पाटील, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी याबाबत गांभीर्याने विचार करून कंत्राटी सुरक्षा रक्षकांच्या मनमानीला चाप लावण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा हे मस्तवाल सुरक्षा रक्षक सर्वसामान्य नागरिकांनाही अडचणीत आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणाचा अहवाल सादर झाल्यावर संबंधित दोषिंवर कारवाई झाल्यानंतरच सर्वसामान्य नागरिकांना ही दिलासा मिळेल.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

वरिष्ठ अधिकाऱ्याला अजूनही क्लिनचीट नाही

या उपअभियंत्याने वैकुंठ स्मशानभूमीत एका विभाग प्रमुखाला मारहाण केल्याचा आरोप कऱण्यात आला होता. त्याप्रकरणात त्यास निलंबित केले होते परंतु 6 महिने कोणतीही चौकशी सुरू न झाल्यामुळे सामाजिक संघटनांनी उपोषणाचे अस्त्र उपसल्यानंतर चौकशी अगोदर जानेवारी महिन्यात सेवेत हजर करण्यात आले. आता याच अधिकाऱ्याला महापालिकेच्या इमारतीतून बाहेर पडल्यानंतर 3 तृतीयपंथी अन् 3 सुरक्षा रक्षकांनी मारहाण केली आहे. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास घटनेचे गांभीर्य लक्षात येईल.