एखाद्या खास दिवसाला सेलिब्रेट करण्याची गुगलची अनोखी पद्धत म्हणजे, गुगल डूडल. गेल्या काही वर्षांपासून गुगलने आपल्या डूडलमध्ये खास छोट्या-छोट्या गेम्स देण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळे, यूजर्सना त्या दिवसाबद्दल माहिती मिळतेच, सोबत त्यांचं मनोरंजन देखील होतं. 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन्स डे म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने देखील गुगलने आपल्या डूडलमध्ये एक गेम सादर केली आहे.






केमिस्ट्री क्युपिड
केमिस्ट्री क्युपिड असं गुगलच्या या गेमचं नाव आहे. यामध्ये तुम्ही स्वतः एक मूलद्रव्य आहात, आणि तुम्हाला दुसऱ्या मूलद्रव्यांशी बाँडिंग करायचं आहे. ही गेम खेळण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी गुगलच्या होम पेजला जावं लागेल. त्यानंतर समोर दिसणाऱ्या गुगल डूडलवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर गेमची मुख्य स्क्रीन उघडेल.
अशी खेळा गेम
तुम्ही कोणतं मूलद्रव्य (Element) आहात हे पाहण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी एक क्विझ खेळावं लागेल. यामध्ये तुमच्या पर्सनॅलिटीबाबत काही साधे-सोपे प्रश्न विचारले आहेत. जसं की, तुम्ही कशा प्रकारच्या व्यक्ती आहात, तुमचं ड्रीम होम काय आहे, तुम्ही व्यायाम करता का.. इत्यादी. अशा केवळ पाच प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर तुम्ही कोणतं मूलद्रव्य आहात हे गुगल तुम्हाला सांगेल.
यानंतर तुम्हाला स्टार्ट बाँडिंग या पर्यायावर क्लिक करायचं आहे. यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक-एक करुन इतर मूलद्रव्यांची प्रोफाईल येईल. एखाद्या डेटिंग अॅपवर ज्याप्रमाणे लेफ्ट किंवा राईट स्वाईप करून तुम्ही इंटरेस्टेड किंवा नॉट इंटरेस्टेड हे ठरवता, त्याचप्रमाणे इथेही करायचं आहे. ज्या मूलद्रव्यासोबत तुम्हाला बाँड करायला आवडेल त्यावर राईट स्वाईप करा.
यानंतर ‘लेट्स कम्बाईन’ या ऑप्शनवर लाँग प्रेस करुन तुम्ही एक नवीन बाँड तयार करू शकता. तुमचं मूलद्रव्य आणि दुसरं मूलद्रव्य बाँड झाल्यानंतर एक नवीन रसायन तयार होईल. असे 18 बाँड्स तयार केल्यानंतर तुम्हाला एक सरप्राईज मिळणार आहे! खालील वेबसाईटवर क्लिक करून तुम्ही ही गेम खेळू शकता.
https://doodles.google/doodle/valentines-day-2024/











