सरकारला २१५चे मोठं पाठबळ; अजितदादासोबत ‘एवढे’आमदार; शिंदेंनी सांगितली ही आकडेवारी

0

विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात निवेदन केलं. मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांवर आसूड ओढला. पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव घेऊन ते माझ्या का मागेल लागले, असा प्रश्न शिंदेंनी उपस्थित केला.

सभागृहात बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, मागील वर्षभर सरकार पडणार-पडणार, अशी भाकितं सुरु होती. पृथ्वीबाबा माझे चांगले मित्र आहेत परंतु ते माझ्या मागे लागले होते. नवीन मुख्यमंत्री होणार, असं ते का म्हणाले हे मी त्यांना विचारलं नाही. पुढे बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले की, सरकारला आता मोठं पाठबळ मिळालं असून १७०चं संख्याबळ २१५ वर गेलेलं आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

”कुणी आपल्या पंतप्रधानांना बॉस म्हणतो, कुणी सेल्फी काढतो, कुणी वाकून नमस्कार करतो. काही म्हणतात, तुम्ही पॉवरफुल आहात. हे आपल्याला अभिमानास्पद आहे. मोदींनी देशाची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावरुन पाचव्या क्रमांकावर आणली. ९ वर्षात एकही सुट्टी न घेतलेला पंतप्रधान आपण बघितला आहे. त्यांचं नेतृत्व या देशाला प्रगतीपथाकडे नेईल. त्यामुळे अजित पवारदेखील सोबत आलेले असून सरकार मजबूत बनलं आहे.”

एकनाथ शिंदेंनी १७० चा आकडा २१५वर गेल्याचं सभागृहात सांगितल्याने अजित पवार गटाकडे ४५ आमदार असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडे सद्य घडीला ८ आमदार असल्याचं दिसून येत आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार