नि:शब्द तरीही सूचक संदेशाची शोकांतिका! दोरीने जमिनीवर धनुष्यबाण बनवलं; मधोमधच गळफास

0
1

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी त्यांच्या कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या केल्याने अवघ्या बॉलिवूडला धक्का बसला आहे. मात्र, आता या घटनेनंतर वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहे. सुरुवातीला त्यांनी काही ऑडिओ क्लिप्स रेकॉर्ड केल्याचं समोर आलं होतं. आता आत्महत्येनंतर घटनास्थळी पोहचलेल्या एका तरुणाने याबाबत एक नवी माहिती दिली आहे. ज्यामुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. एनडी स्टुडीओमुळे कर्जतच्या आजूबाजूच्या गावातील अनेक तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध झाला होता. त्यातील काही जण हे नितीन देसाई यांच्या अत्यंत जवळचे होते. त्यामुळे जेव्हा ही घटना घडली तेव्हा नजीकच्या गावांमधील तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यातीलच एका तरुणाने यावेळी अशी माहिती दिली की, स्टुडिओमधील एका सेटवर जाऊन नितीन देसाई यांनी गळफास घेतला. मात्र, त्याआधी त्यांनी जिथे गळफास घेतला तिथेच जमिनीवर दोरीने एक धनुष्यबाण बनवलं होतं आणि याच धनुष्यबाणाच्या मधोमध उभं राहून त्यांनी गळफास घेतला.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

‘नितीन दादांनी हातांनी बनवला धनुष्यबाण, त्याच्या मधोमध उभं राहून घेतला गळफास’

या घटनेबाबत मयूर नावाच्या तरुणाने माध्यमांशी बोलताना अशी माहिती दिली की, ‘माझं मागील 5-10 वर्षांपासून एनडी स्टुडिओमध्ये येत आहे. पण तिथे मी काही काम करत नव्हतो. पण माझे वडील आणि काका हे दोघंच तिथे संपूर्ण मॅनेजमेंट पाहत होते. नितीन दादांसोबत आमचं चांगले संबंध होते.’

‘आमच्या गावातील एक मुलगा आहे.. जो त्यांच्या अगदी जवळचा होता. त्याला दादांनी सांगितलं होतं की, तू सकाळी माझ्या ऑफिसमध्ये ये 8.30 वाजता.. तिथे एक रेकॉर्डर मिळेल. त्या रेकॉर्डरमध्ये सगळं काही रेकॉर्ड केलं आहे. तो तू ओपन करून पाहा.’ ‘तर तो मुलगा सकाळी साडे आठमध्ये गेला ऑफिसमध्ये. तेव्हा त्याला तिथे रेकॉर्डर मिळाला. त्यात दादांनी असं रेकॉर्ड केलं होतं की, मी या-या सेटअपवर आहे. तू तिथे ये… त्यामुळे त्याने त्या रेकॉर्डरमधलं पुढचं काही ऐकलं नाही. तो सगळ्या त्या सेटवर गेला.. जेव्हा तो सेटवर पोहचला तेव्हा त्याने जे काही पाहिलं त्यानंतर त्याने सगळ्यात आधी आम्हाला फोन केला आणि बोलावून घेतलं. मग आम्ही याबाबतची माहिती तात्काळ पोलिसांना दिली.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

‘आम्ही जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा पाहिलं की, नितीन दादांनी एक भलं मोठं धनुष्यबाण बनवलं होतं जमिनीवर.. ते एका दोरीच्या साहाय्याने बनवलेलं होतं. ते त्यानी स्वत:च बनवलं होतं. त्याच धनुष्यबाणाच्या मधोमध उभं राहून त्यांनी गळफास घेतला.’

‘आता त्यांनी हे असं धनुष्यबाण का बनवलं होतं.. याचं कारण काही माहिती नाही. कारण त्या सेटवर असं धनुष्यबाण वैगरे काही नव्हतं. ते त्यांनी कालच बनवलं आणि त्याच धनुष्यबाणाच्या मधोमध गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह लटकलेला होता.’

‘आम्ही देखील सकाळपासून हाच विचार करतोय की, त्यांनी असं धनुष्यबाण का बनवलं असेल? यातून त्यांना नेमका काय मेसेज द्यायचा होता.. जे कारण असेल ते खरं तर त्यांनाच माहीत.’ असं मयूरने यावेळी सांगितलं.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

आत्महत्या आणि धनुष्यबाणचा नेमका संदर्भ काय?

नितीन देसाई यांच्यावर साधारण 250 कोटींचं कर्ज झालं होतं आणि त्याच विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तसंच आत्महत्येआधी नितीन देसाईंनी ज्या ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केल्या होत्या त्यादेखील पोलिसांच्या हाती लागल्या असून त्याता 4 उद्योजकांचा उल्लेख असल्याचंही समजतं आहे.

मात्र, असं सगळं असताना.. आयुष्य संपविण्याचा अत्यंत टोकाचा निर्णय घेताना नितीन देसाई यांनी स्वत: दोरीने धनुष्यबाण बनवून त्याच्या मधोमध उभं अशाप्रकारे आत्महत्या का केली असावी? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यांच्या कृतीने खरं तर सगळेच जण चक्रावून गेले आहेत. त्यामुळेच त्यांच्या आत्महत्येचा आणि धनुष्यबाणाचा नेमका संदर्भ काय? याचाही आता पोलीस तपास घेत आहेत.