तारीख पे तारीख… स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबतची सुनावणी ढकलली पुढे

0

नवी दिल्ली – महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? याकडे राज्याचं लक्ष लागून आहे. या निवडणुका कधी होणार याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी होती. मात्र आजची सुनावणी पुढे ढकण्यात आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? आज ठरणार भविष्य
92 नगरपालिका मधील ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भातील सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आज इतर मोठी प्रकरणे सुनावणीसाठी असल्यामुळे या प्रकरणावर सुनावणी होऊ शकली नाही.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

मुंबई महानगरपालिकेतील वॉर्ड रचने संदर्भातील सुनावणी आज पार पडली. त्यात राज्य सरकारने पुन्हा तीन आठवड्यांचा वेळ वाढवून मागितला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भातील पुढची सुनावणी कधी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे वारंवार तारखा पुढे ढकलत असल्याने निवडणुकांच भवितव्य अंधारात दिसून येत आहे.