बौद्धजन सहकारी संघाच्या वतीने आयोजित वर्षावास प्रवचन मालिका सांगता समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

0
2

मुंबई दि. २८ (रामदास धो. गमरे) बौद्धजन सहकारी संघ व संस्कार कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे याही वर्षी आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत दर रविवारी वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले होते सदर वर्षावास कार्यक्रमाचा सांगता समारंभ कार्याध्यक्ष दिपक मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली दि. २७ ऑक्टोबर २०२४ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह, नायगाव मुंबई – १४ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर प्रसंगी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना पुष्पमाला अर्पण करून, महिलांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले, संजय गमरे व सहकारी यांनी सुमधुर सुरात धार्मिक विधीपठण केले. तद्नंतर स्वागताध्यक्ष व संस्कार समिती अध्यक्ष संदीप गमरे यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत केले तसेच संघाचे सरचिटणीस संदेश गमरे व संस्कार समिती चिटणीस सचिन मोहिते यांनी लाघवी भाषाशैलीत सूत्रसंचालन करून उपस्थितांची मने जिंकून घेतली. कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुंबई विभाग कार्याध्यक्ष दीपक मोहिते यांनी प्रस्ताविक सादर करताना “निवडणूक व आजवर चाललेल्या कामकाजाचा आढावा घेत, संस्कार समितीच्या वर्षावास प्रवचन मालिकेच्या प्रयोजनाची माहिती देत संघाची ध्येयधोरणे समजावून सांगितली, तसेच गाव व मुंबई वर्षावास प्रवचन मालिका दरवर्षी गावी होत असते परंतु यंदाच्या वर्षी काही तांत्रिक अडचणींमुळे सदर कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्यात आला असला तरी पुढील वर्षी सदर कार्यक्रम गावीच आयोजित करण्यात येईल” असे सूचित केले. संघाचे नियोजित अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी पाठवलेला समाज बांधवाप्रती आदरभाव, प्रेम, जिव्हाळा असलेला शुभेच्छापर संदेश सरचिटणीस संदेश गमरे यांनी वाचून दाखविला सदर संदेश ऐकून सभागृह भारावून गेले व उपस्थित जनसमुदायाने टाळ्यांचा कडकडाट करून संदेश स्वीकार केला.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

सदर प्रसंगी उपकार्याध्यक्ष अशोक कदम, कोषाध्यक्ष प्रदीप कदम, न्यायदान कमिटी अध्यक्ष संजय पवार, शिक्षण समिती अध्यक्ष संजीवनी यादव, अंतर्गत हिशोब तपासनीस शैलेंद्र पवार, विभाग अधिकारी संतोष कदम, सुनील कदम, संतोष पवार, सुनील पवार, किशोर जाधव, वीरेंद्र पवार, शैलेंद्र जाधव, सचिन गमरे, संस्कार समितीच्या सुविधा कदम, ज्योती जाधव, माजी अध्यक्ष सिद्धार्थ पवार, न्यायदान कमिटी माजी अध्यक्ष शशिकांत मोहिते, विभाग क्र. ३ चे माजी अध्यक्ष अनंत सुर्वे, विभाग क्र. ४ चे अध्यक्ष सुभाष मोहिते, तळवली शाखेचे अध्यक्ष रवींद्र पवार आदी मान्यवरांनी उपस्थिती लाभली त्या सर्वांनी आपले मौलिक विचार मांडून उपस्थितांना मार्गदर्शन केले तद्नंतर संस्कार समिती अध्यक्ष संदेश गमरे यांच्या शुभहस्ते स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सर्व उपस्थित मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमाला मान्यवरांसह १०० ते १२५ उपासक उपासिका हजर होते. सरतेशेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष व कार्याधक्ष दीपक मोहिते यांनी उपस्थित्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे