दक्षिण मुंबई बौद्धजन सेवा संघाच्या वतीने वर्षावास मालिका समारोप कार्यक्रम उत्साहात संपन्न

0
1

मुंबई दि. २४ (रामदास धो. गमरे) दक्षिण मुंबई बौद्धजन सेवा संघ, भारतीय बौद्ध महासभा (दक्षिण मुंबई झोन क्र. १), बौद्धजन पंचायत समिती, बौद्धजन सहाय्यक संघ, सार्वजनिक जयंती उत्सव समिती, माझगाव, ताडवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात येत असते, सालाबादप्रमाणे याही वर्षी आयोजित प्रवचन मालिकेचा सांगता समारंभ सोमवार दि. २१ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ७:०० वाजता दक्षिण मुंबई सेवा संघाचे अध्यक्ष आणि बौद्धजन पंचायत समितीचे चिटणीस व गटक्रमांक ३ चे गटप्रतिनिधी भगवान तांबे यांच्या अध्यक्षतेखाली नालंदा बुद्धविहार, माझगाव, ताडवाडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा

सदर प्रसंगी उपस्थित पाहुण्यांच्या शुभहस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार हार अर्पण करून ज्योत प्रज्वलित करण्यात आली, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश जाधव यांनी लाघवी भाषाशैलीत करून उपस्थितांची मने जिंकून घेतली, तर पाहुण्यांचे स्वागत दीपक श्रीरसागर यांनी केले, कार्यक्रमाचे प्रस्ताविक सादर करताना अध्यक्ष भगवान तांबे यांनी “दक्षिण मुंबई विभागात बौद्धजन सेवा संघ आणि अंतर्गत मोडणाऱ्या सर्व संघटनांच्या वतीने सर्वांच्या सहकार्याने अनेक उपक्रम राबविण्यात येतात व ते यशस्वीपणे पार पाडले जातात, सदर कार्यक्रम ही आपण त्याचप्रमाणे सादर करीत आहोत व असेच अनेक उपक्रम भविष्यात ही आपण राबवू” असे नमूद केले.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

सदर कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सचिव अशोक केदारे यांनी अश्विन पौर्णिमा या विषयावर सखोल असे मार्गदर्शन करून उपस्थितांना मौलिक अशी माहिती दिली, सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या मोहन मर्चंडे, अभिषेक जाधव, मीनाक्षी सकपाळ, लक्ष्मी जाधव, उर्मिला जाधव, दिपक मिर्के, गोपीनाथ कदम, बबन भद्रिगे, सुभाष गमरे, उत्तम रोकडे, मिलिंद सकपाळ, बौद्धाचार्य बबन गायकवाड, संजीवन यादव, प्रकाश तांबे, आनंद कदम, विश्वास मोहिते, विकास बल्लाळ, विकास सोनवणे, मिलिंद लोखंडे, महादेव रोकडे, अनिल सोनावणे, शंकर उबाळे, अनिल सोरटे, दीतेश जाधव, प्रतिक मिर्के, मोहनिष महेंद्र जाधव, नितिन सखाराम जाधव, संतोष मोहिते, सदानंद तांबे, संतोष थोरात, विजय गायकवाड, अजित परिहार, अनिल वाघमारे, किशोर काशिकेदार, शांतू डोळस, सिद्धार्थ कांबळे, श्रीधर जाधव आदी मान्यवर या सर्वांचे संघाच्या चिटणीस ऍड. अनुराधा प्रदीप साळवे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार