खांदा कॉलनी येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन व कौटुंबिक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

0
30

नवी मुंबई दि. २२ (रामदास धो. गमरे) बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ७४१, माता रमाई महिला मंडळ, तक्षशिला तरुण मंडळ, खांदा कॉलनी यांच्यावतीने यांच्या संयुक्त विद्यमाने ६८ वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन व कौटुंबिक मेळावा तक्षशिला बुद्ध विहार, खांदा कॉलनी, पनवेल येथे शाखेचे अध्यक्ष नथुराम साखरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर प्रसंगी बौद्धजन पंचायत समितीचे कोषाध्यक्ष व कामोठे विभाग प्रतिनिधी नागसेन सुरेश गमरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली व प्रवचनकार प्रीती आढाव (एम.ए. इन पाली) या प्रमुख व्यक्त्या म्हणून उपस्थित होत्या, चिटणीस अभिजित जाधव यांनी लाघवी भाषाशैलीत अत्यंत प्रभावी असे सूत्रसंचालन करून उपस्थितीतांना मंत्रमुग्ध केले.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

प्रमुख व्यक्त्या म्हणून बोलत असताना “मैत्रीची संकल्पना ही बुद्ध धम्मातून आलेली आहे, तथागत गौतम बुद्ध यांच्यानुसार प्रज्ञा, शिल व करुणा ही त्रिसूत्री आवश्यक आहे परंतु त्याही पलीकडे जाऊन मैत्री आवश्यक आहे, मैत्री म्हणजे सर्व जिवंत प्राणिमात्राविषयी प्रेम, बुद्ध सांगतात की सर्व प्राणिमात्रांनी सर्व प्राणीमात्राशी मैत्री जोडावी, तुमची मैत्री केवळ समुहा पुरती मर्यादित न राहता ती विश्व व्यापक असावी, त्या मैत्रीत कुणाही प्रती द्वेषाला थारा नसावा. मैत्री भावनेने आपल्या जीवनात अमुलाग्र बदल होतो” असे संबोधित केले. तद्नंतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यी, सेवानिवृत्त सभासद तसेच ७० वर्षावरील ज्येष्ठ सभासदांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा

सदर प्रसंगी अंकुश मोहिते, उपाध्यक्ष भगवान कांबळे, उपचिटणीस प्रशांत गमरे, कोषाध्यक्ष जनावस कदम, महिला मंडळ अध्यक्ष पुष्पाताई जाधव व सर्व पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते, महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते, सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानून चिटणीस अभिजीत जाधव यांनी कार्यक्रमाची सांगता केली.