140कोटी देशवासीयांना पुरस्कार समर्पीत! टिळक अन् सावरकरांचा नातं उलघडत मोदींनी पुणेकरांना जिंकल

0
1

पुणे: महारष्ट्राच्या भूमीला मी कोटी कोटी वंदन करतो, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीत आपल्या भाषणाची सुरुवात करताच पुणेकरांनी टाळ्या वाजवत कौतुक केलं. लोकमान्य टिळक पुरस्कार अत्यंत महत्त्वाचा आहे. पुण्याच्या पुण्यभूमीत येण्याची मला संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. पुणे ही टिळक, फुले, चाफेकर या वीरांची भूमी आहे. लोकमान्य टिळक पुरस्कार स्विकारताना मला आनंद होत असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

टिळक पुरस्काराने माझी जबाबादारी वाढली
यावेळी त्यांचं स्वागत पुणेरी पगडी, सन्मानपत्र आणि भेट देऊन करण्यात आलं. मोदींनीही यावेळी मराठीतून जनसागराशी संवाद साधत कार्यक्रमात अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. मोदी म्हणाले, हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय अनुभव आहे. एखादा पुरस्कार जेव्हा मिळतो तेव्हा जबाबादारी देखील वाढते. हा पुरस्कार मी 140 कोटी देशवासीयांना समर्पीत करतो.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुरस्कार समारंभाला नेत्यांची मांदियाळी
राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे उपस्थित होते. यावेळी त्यांचं स्वागत पुणेरी पगडी भेट देऊन करण्यात आलं. मोदींनीही यावेळी मराठीतून जनसागराशी संवाद साधत कार्यक्रमात अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला.

टिळक पुरस्काराचा निधी नमामि गंगेला देण्याचा निर्णय
ज्यांच्या नावात साक्षात गंगा नदीचे नाव आहे. अशा पुरस्काराची रक्कम मी नमामि गंगा या प्रोजेक्टला देण्याचा निर्णय घेतला आहे. देशात पुणे आणि काशीला विशेष महत्त्व आहे. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यलढ्याला वेगळे वळण दिले आहे.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

कोरोनाची लस तयार करण्यात पुण्याचे महत्त्वाचे योगदान
गेल्या नऊ वर्षात भारतीयांनी परिवर्तन करुन दाखवलं. भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे हे भारतीयांनी जगाले दाखवलं. संकटकाळात भारताने वैज्ञानिकांवर विश्वास दाखवला, मेड इन इंडिया लस बनवली. कोरोनाची लस तयार करण्यात पुण्याचे महत्त्वाचे योगदान असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

भाषणात सावरकरांचा उल्लेख
टिळकांकडे दूरदृष्टी होती. सावरकर तरूण होते होते त्यावेळीच टिळकांनी त्यांची क्षमता ओळखली.त्यांची इच्छा होती, सावरकरांनी परदेशात जाऊन शिक्षण घ्यावे. त्यानंतर इथे येऊन स्वातंत्र्य लढ्यात सहभागी व्हावे. लोकमान्य टिळक यांनी वीर सावरकर यांना बॅरिस्टर होण्यासाठी मदत केली, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर