मिळकतकर सवलतीचा शेवटचा दिवस; पुणे महापालिकेचे संकेतस्थळ क्रॅश व्यवहार ठप्प

0
1

पुणे – मिळकतकराची सवलत घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस असताना सकाळपासून पुणेकर ऑनलाइन कर भरणा करण्यासाठी संकेतस्थळावर तुटून पडले, त्यामुळे पुणे महापालिकेचे संकेतस्थळ क्रॅश झाल्याने व्यवहार ठप्प झाले आहेत. नागरिकांना घरी बसून आणि क्षेत्रीय कार्यालयात जाऊन देखील कर भरता येत नसल्याने खोळंबा झाला आहे. गेल्या वर्षी देखील अशीच स्थिती निर्माण झालेली असताना त्यातून महापालिका प्रशासनाने कोणताही धडा घेतला नसल्याचे यावरून स्पष्ट झालेले आहे.

पुणे महापालिकेतर्फे नागरिकांना १५ मे ते ३१ जुलै या अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये निवासी मिळकत करावर पाच ते दहा टक्के सूट देण्यात आलेली आहे. गेल्या अडीच महिन्यात महापालिकेला सुमारे अकराशे कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न यामधून मिळालेली आहे. आज या सवलतीचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे कर भरणा करण्यासाठी नागरिकांची गडबड सुरू आहे.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

ऑनलाइन माध्यमातून तसेच क्षेत्रीय कार्यालयातील नागरी सुरुवातीला सुविधा केंद्र मध्ये जाऊन नागरिक कर भरत आहेत. सकाळी दहा वाजता क्षेत्रीय कार्यालय सुरू झाल्यानंतर लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. मात्र एकाच वेळी अनेक नागरिक संकेतस्थळावर कर भरत असल्याने महापालिकेची ऑनलाईन यंत्रणा कोलमडून गेली आहे.

संकेतस्थळ सुरू होत नसल्याने नागरिकांना कर भरता येत नाही. त्याचप्रमाणे अनेक नागरिक नागरिक सुविधा केंद्रांमध्ये जाऊन रांगेमध्ये उभे आहेत पण येथील यंत्रणा देखील बंद पडली आहे त्याचा फटका बसला आहे.

गेल्या वर्षी देखील शेवटच्या दिवशी कर भरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलेली होती. त्यामुळे महापालिकेची ऑनलाईन यंत्रणा पडून गेली होती. त्यानंतर दोन दिवस मुदतवाढ देण्यात आलेली होती. यंदाच्या वर्षी देखील महापालिकेची ऑनलाईन यंत्रणा क्रॅश होण्याची नामुष्की व धावलेली आहे. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ऑनलाइन यंत्रणा बंद पडली. दुपारचे बारा वाजले तरीही यंत्र सुरू झालेली नव्हती.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

मिळकतकर विभागाचे प्रमुख अजित देशमुख म्हणाले,”ऑनलाइन कर भरणा प्रक्रिया काही कारणामुळे बंद झालेली आहे. विद्युत विभाग आणि संगणक विभागाच्या मदतीने हे यंत्रणा सुरू करण्यासाठी आमच्या प्रयत्न सुरू आहेत. लवकरच याबाबत आपल्याला अपडेट दिले जाईल.

मिळकत कराची सवलत घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस असताना शनिवार येथील क्षेत्रीय कार्यात गेलो होतो. त्यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी महापालिकेचे सर्व्हर ठप्प असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कर भरण्यात अडचणी येत आहेत असे सांगितले. आजचा शेवटचा दिवस असल्याने सवलत मिळाली नाही तर आम्हाला भर भर्दंड सहन करावा लागेल प्रतिक्रिया सत्येंद्र राठी यांनी दिली.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर