अधिवेशन संपताच पुन्हा मंत्रिमंडळ खांदेपालट?; भाजप-सेनेच्या मंत्र्यांमध्येही अंतर्गत बदल होणार

0

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार सोबत घेऊन बंड केलं. यानंतर त्यांनी भाजपशी हातमीळवणी केली आणि राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. यानंतर २ जुलै २०२३ रोजी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील राष्ट्रवादीचे समर्थक आमदार सोबत घेते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. दरम्यान शिंदे गट आणि भाजपचे आमदार मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहत असतााना अजित पवार आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदासोबतच अर्थ खात्याची जबाबदारी देखील देण्यात आली.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

मात्र, यानंतर एकनाथ शिंदे गटात तसेच भाजपच्या गोटात देखील मंत्रिपदासाठी रांगेत असलेले काही आमदार नाराज झाल्याच्या चर्चा समोर आल्या. दरम्यान आता या सर्व नाराज आमदारांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून लवकरच राज्यात पुन्हा मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

शिंदे-फडणवीस सरकारचा चौथा आणि शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा दुसरा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवशन सुरू आहे. हे अधिवेशन संपताच मंत्री मंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात १५ ॲागस्टच्या आत नवीन पालकमंत्र्यांची घोषणा होऊन जिल्ह्यांना नवीन पालकमंत्री मिळण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

शिंदे गटातील आमदारांची नाराजी आणि आगामी लोकसभा विधानसभा निवडणूका लक्षात घेता मंत्रीमंडळ विस्तार केला जाण्यावर विचार सुरू असल्याचे समोर आले आहे. तसेच भाजपा आणि शिवसेनेच्या काही मंत्रीमंडळात अंतर्गत खांदेपालट होण्याची देखील शक्यता वर्तविली जात आहे.

मंत्रीमंडळ विस्तार होताच पालकमंत्री पदे हि दिली जाणार असल्याचे देखील बोलले जात आहे. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील या मंत्रिमंडळ विस्तारात नेमकं कोणत्या नेत्यांनी मंत्रिपद मिळेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.