बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल गेल्या महिन्यात 23 जून रोजी लग्न बंधनात अडकले. कुटुंबाच्या आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत त्यांनी रजिस्टर मॅरेज केलं. त्या दोघांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. सोनाक्षी सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांसोबत नवरा झहीरसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. या सगळ्यात त्या दोघांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात सोनाक्षी आणि झहीर एकत्र दिसत आहेत.






हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर नेटकऱ्यांसमोर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की सोनाक्षी ही प्रेग्नंट आहे. सोनाक्षीचा हा व्हिडीओ फिल्मीग्यान या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत झहीर इक्बाल आणि सोनाक्षी दिसत आहेत. ते दोघं रेस्टॉरंटमधून बाहेर येताना दिसत आहे. या दरम्यान, सोनाक्षी रेस्टॉरंटच्या पायऱ्या उतरत असताना झहीर तिला सांभाळताना दिसत आहे.
त्यासोबत झहीर हा सोनाक्षीचा हात धरून तिला गाडीत बसवल्याचे पाहायला मिळत आहे. सोनाक्षी आणि झहीरच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी त्यांची प्रतिक्रिया जाहिर केली आहे. दरम्यान, जास्त नेटकरी त्या व्हिडीओवर कमेंट करत प्रेग्नंट असलयाचं म्हणत आहेत. काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे की ‘या आउटफिटमध्ये सोनाक्षी तिचं बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करत आहेत.’ तर अनेकांचं म्हणणं आहे की ‘एका महिन्यात ही प्रेग्नंट झाली.’ एका नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की ‘प्रेग्नंसी मोड.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘ही पण प्रेग्नंट झाली?’
‘ईटाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत सोनाक्षीनं म्हटलं होतं की ‘झहीरशी लग्न करून ती घरी परतल्यासारखं वाटतंय. कारण आतापर्यंत त्या दोघांना एकत्र असा वेळ मिळाला नव्हता. सोनाक्षीनं हे देखील सांगितलं की तो आधीपासूनच तिचा चांगला मित्र होता आणि आम्ही आधी लग्न केलं असतं तर बरं झालं असतं. सोनाक्षीनं म्हटलं की मी खूप आनंदी आहे कारण मला वाटतं की मी असं काही केलं आहे ज्याची मी बऱ्याच काळापासून प्रतीक्षा करत होते आणि आता मला वाटतं की मी तिथेच आहे जिथे मला असायला हवं होतं.’











